Hashtagintro

Farhana Bhatt : ‘प्रचंड ब्लीडिंगमुळे शरीर सुन्न पडलेलं आणि..’ भयानक अनुभवानंतर फरहाना भट्टचा मोठा निर्णय

Farhana Bhatt : ‘प्रचंड ब्लीडिंगमुळे शरीर सुन्न पडलेलं आणि..’ भयानक अनुभवानंतर फरहाना भट्टचा मोठा निर्णय

Farhana Bhatt Share Painful Story: आयुष्यात आलेल्या भयानक अनुभवानंतर प्रत्येक जण कोणता ना कोणता मोठा निर्णय घेतोच… असंच काही अभिनेत्री फरहाना भट्ट हिने देखील केलं आहे. टीव्ही विश्वातील लोकप्रिय शो ‘बिग बॉस 19’मुळे फरहाना भट्ट हिला प्रसिद्धी मिळाली. तर रोहित शेट्टी याच्या ‘खतरों के खिलाडी 15’ या शोमध्ये देखील फरहाना हिने दमदार स्टंट केले. ‘खतरों के खिलाडी 15’ शोमध्ये फरहाना हिने एकापेक्षा एकार स्टंट केले आणि दमदार कंटेस्टेंट म्हणून प्रसिद्धीझोतात आली. पण शोच्या फायनलिस्टपर्यंत पोहोचण्याचा प्रवास फरहाना हिच्यासाठी बिलकूल सोपा नव्हता. तिला अनेक आरोग्याच्या समस्यांचा समाना करावा लागला… तर जाणून घ्या फरहाना भट्ट नेमकं काय म्हणाली आहे.

खूप जास्त ब्लीडिंग होऊ लागलेली…

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत फरहाना हिने सांगितलं की, शोच्या पहिल्यात एपिसोडमध्ये तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागला… फरहाना हिने सांगितलं की, पहिल्याच स्टंट दरम्यान ती प्रचंड घाबरलेली आणि जेव्हा चॉपरने तिला नदीमध्ये ढकललं, तेव्हा तिला प्रचंड ब्लीडिंग होऊ लागलेलं…

फरहाना म्हणाली, ‘त्यानंतर मी माझ्या हॉटेलमध्ये गेली आणि आयुष्यात मला इतक्या वेदना झाल्या नसतील तेव्हा वेदना काय असतात ते मी पाहिलं… मला उभं देखील राहता येत नव्हतं… मी पूर्ण फ्रीज झालेली. मी माझ्या गायनेकोलॉजिस्टला फोन केला आणि सांगितलं की, हे सर्वकाही फक्त तणावामुळे होत आहे… माझ्या शरीरावर अचानक स्ट्रेस आलं आणि मी डॉक्टरांना विचारलं की, दुसऱ्या दिवशी मी स्टंट कशी करू… ही पहिली वेळ होती, जेव्हा मला पेनकिलर खावी लागलेली… तेही प्रत्येक दिवशी 2…’

पुढे फरहाना म्हणाली, ‘भारतात परतल्यानंतर तीन महिन्यांनी पुन्हा ब्लीडिंग होण्यास सुरुवात झाली. तेव्हा देखील डॉक्टरांनी मला सांगितलं की, हे स्ट्रेसमुळे होत आहे.. तेव्हा देखील झालेल्या वेदना मी सांगू शकत नाही. पण याबद्दल मी कोणाला काही सांगितलंच नाही. ही माझी सवय आहे. जेव्हाही काही होतं, मी कोणाला सांगत नाही. ती गोष्ट मी माझ्यापर्यंत ठेवते..’ यावेळी फरहाना हिने असं देखील सांगितलं की, बिग बॉसच्या घरात तिला एंग्जायटी अटॅक आले आहेत…

फरहाना भट्ट हिचा मोठा निर्णय…

फरहाना हिने सप्टेंबरमध्येच सांगितलं होतं की, ‘खतरों के खिलाडी 15’ च्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक अनुभवानंतर तिला ॲडव्हेंचर-बेस्ड रिॲलिटी शोपासून काही काळ विश्रांती घ्यायची आहे. यासोबतच तिने हे स्पष्ट केलं की, ती ‘रोडीज’च्या नवीन सीझनमध्ये गँग लीडर म्हणून सामील होणार नाही.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language