Hashtagintro

Ramayana: केवळ 50 सेकंदात बघा संपूर्ण रामायण! सुंदर स्केचेसची सोशल मीडियावर चर्चा

Ramayana: केवळ 50 सेकंदात बघा संपूर्ण रामायण! सुंदर स्केचेसची सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सोशल मीडिया हे एक असं माध्यम झालं आहे ज्यावर प्रश्नही मांडता येतात आणि आपलं टॅलेंटही मारता येतं. अनेकांसाठी हे अगदी कमाईचं साधन झालं आहे. कलाकारांसाठी तर हे अतिशय उत्तम साधन आहे. यावर कलाकार त्यांची कला सहज सादर करू शकतात आणि ती अनेक लोकांपर्यंत पोहचवूही शकतात.असंच एका कलाकाराने केलं आहे. अदिती नावाच्या एका कलाकाराने एक अतिशय अनोखी कलाकृती निर्माण केली आहे. तिने संपूर्ण रामायण आपल्या कलेच्या माध्यमातून अशा प्रकारे साकारले आहे की, जणू काही आपण ते दूरदर्शनवरच पाहतोय की काय असं वाटतं. तिच्या या कलाकृतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, लोकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

५० सेकंदात रामायण बघा

अदितीने ‘artworldbyadi’ या तिच्या प्रोफाइलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिडीओमध्ये कार्डबोर्डपासून बनवलेला एक ‘टेलिव्हिजन’ संच दिसतो, ज्यातील प्रत्येक रेखाटलेल्या चित्रात रामायणातील एक प्रसंग मांडला आहे.

तब्बल १८ तासांची मेहनत

अदितीने ही संपूर्ण कलाकृती कार्डबोर्ड आणि कागदाचा वापर करून तयार केली आहे. प्रत्येक दृश्यात रामायणातील विविध प्रसंग आणि कथा रेखाटल्या आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तिला तब्बल १८ तास लागले. तिने ‘रामलीला’ हे आपल्या प्रेरणेचे स्रोत असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे, ही कलाकृती तयार करण्यासाठी अदितीने बाजारातून कोणतेही नवीन साहित्य विकत घेतलेली नाही.

पेनच्या साहाय्याने बदलणारी स्क्रीन!

या व्हिडीओमध्ये दिसते की, वर लावलेला फोन फिरवल्या प्रत्येक वेळी बदलते. अदितीला ही कलाकृती तयार करण्याची प्रेरणा तुषार वर्मा यांच्याकडून मिळाली. तिने आपल्या पोस्टमध्ये त्यांना टॅग करताना याचा उल्लेखही केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi (@artworldbyadi)

तिच्या या कलाकृतीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक भरभरून तीच कौतुक करत आहेत.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language