Hashtagintro

Sania Mirza : सानिया मिर्झा खरंच सिंगल… वयाच्या 39 व्या वर्षी थाटणार दुसरा संसार! कोणी दिले मोठे संकेत?

Sania Mirza : सानिया मिर्झा खरंच सिंगल… वयाच्या 39 व्या वर्षी थाटणार दुसरा संसार! कोणी दिले मोठे संकेत?

Sania Mirza : भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही महिन्यांपासून तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर सानिया एकटीच मुलाचा सांभाळ करत आहे. तर पूर्व पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे. घटस्फोटानंतर शोएब मलिक याला टीकेचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर, असं देखील समोर येत आहे की, शोएब याच्या तिसऱ्या लग्ना त्याचे कुटुंबिय देखील सामिल झाले नव्हते. सानिया हिला घटस्फोट दिल्यानंतर तिसऱ्या लग्नासाठी शोएब याच्या कुटुंबियांचा विरोध होता. अशात गेल्या अनेक दिवसांपासून एकच प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणेज सानिया मिर्झा दुसरं लग्न करणार का?

सांगायचं झालं तर, अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ शोमध्ये सनिया मिर्झा पाहुणी म्हणून आलेली. तिच्यासोबत फराह खान देखील होती. फराह आणि सानिया चांगल्या मैत्रिणी आहेत. या टॉक शोमध्ये खुद्द सानिया हिने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल फार मोठे खुलासे केले. सानिया हिने असं देखील सांगितलं की, ती सिंगल आहे आणि तिला तिच्या आयुष्यात दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीची गरज नाही.

टॉक शोमध्ये अंगद याने सानियाला प्रश्न विचारला, ‘तुला कधी कोणत्या मित्राने कॉफी डेटसाठी विचारलं नाही?’ यावर सानिया म्हणाली, ‘ते मला मुलांच्या ट्रिपसाठी बोलवतात आणि मला एक मुलगा म्हणूनच ट्रीट करतात.’, पुढे फराह म्हणाली, ‘मला माझे मित्र फोन करुन विचारतात सानिया खरंच सिंगल आहे का?’ यावर उत्तर देत सानिया म्हणाली, ‘मी खरंच सिंगल आहे…’

पुढे अंगद याने विचारलं, ‘तुला असं कधी वाटत नाही का, एका पुरुषासोबत चांगले क्षण घालवावे…’, यावर तात्काळ फराह म्हणाली, ‘तुला काय माहित की आयुष्याचा आनंद घेत आहे की नाही…’, फराह हिला सपोर्ट करत सानिया म्हणाली, ‘माझ्या आयुष्यात कोणताच पुरुष नाही… आणि माहिती नाही पुढे असू शकतो की नाही…’

सानिया हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, 2010 मध्ये तिने सानिया हिने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब याच्यासोबत लग्न केलं. दोघांनी एका मुलाचं देखील जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2023 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सांगायचं झालं तर, सानिया ही शोएबची दुसरी पत्नी होती. घटस्फोटानंतर शोएब यांने तिसरं लग्न पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत केलं.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language