
जगभरात दिवाळीचा सण साजरा होत आहे. सगळीकडे आनंदाचं वातावरण असताना एक वाईट घटना समोर आली आहे. ही घटना अमेरिकेत घडली आहे. तिथे दिवाळीच्या उत्सवादरम्यान वांशिक द्वेषाची एक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील अति-उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते जेक लँग याने सिएटलमध्ये आयोजित दिवाळी कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. एवढंच करून तो थांबा नाही तर त्याने थेट सोशल मीडियावर हिंदू समुदायाविरुद्ध अपमानास्पद कमेंटही केली. यामागचं कारण असं समोर आले आहे की, मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्यामुळे जेक लँग अस्वस्थ होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा राग त्याने हिंदू समुदायावर काढला असे सांगितले जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते जेक लँग याने दिवाळी उत्सवात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टनमधील सिएटल येथे हा कार्यक्रम पार पडत होता. जेकने गोंधळ घालायला सुरुवात केल्यावर उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्याला रोखले. या घटनेदरम्यान, लँग आणि त्यांच्यासोबत असलेल्या आंदोलकांनी हातात फलक धरले होते. त्या फलकांवर ‘डिपॉर्ट ऑल डॉट-हेड्स’ म्हणजे भारतीयांना उद्देशून वापरलेला एक अपमानास्पद शब्दप्रयोग अशी घोषणा लिहिलेली होती. मात्र, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांनी या सगळ्यांना पुढे जाण्यापासून रोखले.
जेक लँगने सोशल मीडियावर पोस्ट केले फोटो
जेक लँगने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामधून स्पष्टपणे दिसून येत आहे की तो समारंभात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासोबतच त्याने हिंदूंविरुद्ध अपमानास्पद भाषेचाही वापर केला. त्याने असा दावा केला की, टेक्सास राज्य ‘ब्लू’ (डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने) होण्यामागे हिंदू जबाबदार आहेत.
काय आहे जेकची पोस्ट?
आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये जेक लँगने लिहिले की, ‘सिएटलच्या दिवाळी उत्सवात, डझनभर अँटिफा सदस्य आणि हिंदूंनी आमच्यावर हल्ला केला!!!! मला वाटतं त्यांना आमचा फलक आवडला नाही!!!! हिंदूंनी टेक्सास ‘निळा’ केला. ते नरकात जावोत.”
We were just ASSAULTED by dozens of ANTIFA & HINDUS the Seattle Diwali Festival!!!!
I guess they didn’t like our “Deport All Dot Heads” sign!!!
Hindus flipped Texas blue. Fuck them. https://t.co/mS3oBdEAYZ
— Jake Lang – January 6 Political Prisoner (@JakeLang) November 8, 2026
अलीकडेच मंदिराला लक्ष्य करण्याचाही प्रयत्न
ही घटना घडण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच अशीच एक घटना शिकागोमध्ये घडली होती. शिकागो जवळील एका हिंदू मंदिराला लक्ष्य करण्याचा कट रचला गेला होता. एका उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीशी संबंधित एक प्रकरण समोर आले होते. या हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याची धमकी मिळाल्यानंतर, तपास करण्यात आले. यासंदर्भात १९ वर्षीय संशयित अलेक्झांड्रोस पॅपोराकिस याला अटक करण्यात आली. नाझी विचारसरणी मानणारा पॅपोराकिस याने या हिंदू मंदिरात सामूहिक गोळीबार करण्याचा कट रचला होता, असा आरोप आहे.
Source: TV9 Marathi International
