Hashtagintro

Diwali Padwa Gift: दिवाळी पाडव्याला बायकोला द्या हटके गिफ्ट! ‘या’ ४ भेटवस्तू ठरतील खास

Diwali Padwa Gift: दिवाळी पाडव्याला बायकोला द्या हटके गिफ्ट! ‘या’ ४ भेटवस्तू ठरतील खास

दिवाळीचा सण म्हटला की आनंद, उत्साह आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण आलीच. दिवाळीतील पाडवा हा नवरा बायकोतील नात्यासाठीही विशेष महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते, तर पतीही तिला एखादी खास भेटवस्तू देऊन तिच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करतो. मात्र, बायकोसाठी नेमकी कोणती भेटवस्तू निवडावी, असा प्रश्न अनेकांना पडतो. अशा वेळी तिच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दागिने, पर्स किंवा मेकअप प्रॉडक्ट्स यांसारख्या भेटवस्तू निवडता येतील. पाडव्याला बायकोला खूश करण्यासाठी या गिफ्ट आयडिया नक्की पाहा.

खास पेंडंट किंवा दागिना भेट द्या
महिलांना दागिने घालायला आवडतात. त्यामुळे पाडव्याच्या निमित्ताने पत्नीला सुंदर पेंडंट भेट देऊ शकता. तिच्या नावाचे किंवा नावाच्या पहिल्या अक्षराचे कस्टमाइज्ड पेंडंट निवडल्यास या भेटवस्तूला आणखी खास महत्त्व प्राप्त होईल. रोजच्या वापरासाठी किंवा एखाद्या खास प्रसंगासाठी वापरता येईल, असा दागिना निवडू शकता.

सुंदर पैंजण द्या
पत्नीला पारंपरिक दागिने आवडत असतील तर सुंदर पैंजण हा चांगला पर्याय ठरू शकतो. बाजारात वेगवेगळ्या डिझाइनमधील चांदीचे पैंजण उपलब्ध आहेत. तिच्या आवडीनुसार साधे, नाजूक किंवा आकर्षक डिझाइनचे पैंजण निवडून पाडव्याची भेट देऊ शकता. पारंपारिक पैंजण शिवाय तुम्ही स्टर्लिंग सिल्वहरचे नवे अँक्लेट देऊ शकता.

हँडबॅग किंवा पर्स भेट द्या
बहुतेक महिलांना वेगवेगळ्या डिझाइनच्या हँडबॅग आणि पर्स वापरायला आवडतात. त्यामुळे पत्नीला तिच्या आवडीच्या रंगाची आणि डिझाइनची हँडबॅग भेट देऊ शकता. ऑफिस, शॉपिंग किंवा बाहेर जाताना वापरता येईल अशी बॅग निवडल्यास ही भेट उपयोगीही ठरेल. तिच्या नावाचे कस्टमाइज्ड हँडबॅगही एक वेगळा पर्याय ठरू शकतो.

मेकअप प्रॉडक्ट्सचा सेट द्या

पत्नीला मेकअपची आवड असेल तर तिला मेकअप प्रॉडक्ट्सचा सेट भेट देऊ शकता. लिपस्टिक, काजळ, मस्कारा, आयशॅडो किंवा तिच्या आवडीची इतर ब्युटी प्रोडक्ट निवडता येतील. अनेकदा आवड असूनही काही महागडी मेकअप उत्पादने खरेदी करणे टाळले जाते. अशा वेळी तिच्या आवडीचे प्रॉडक्ट्स निवडून दिल्यास तिला नक्कीच आनंद होईल.

Source: TV9 Marathi Lifestyle

Read full article on TV9 Marathi Lifestyle

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language