Hashtagintro

IRCTC कडून मुंबईहून ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वे चालवणार, अशी आहे योजना

मुंबई: भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC), पश्चिम विभाग, मुंबईतर्फे भारत गौरव विशेष पर्यटन रेल्वेअंतर्गत ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ या विशेष पर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रेल्वे 18 जानेवारी 2027 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), मुंबई येथून रवाना होणार आहे.
11 रात्र आणि 12 दिवसांच्या या विशेष सहलीद्वारे पर्यटकांना दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/09/minister-nitesh-rane-celebrates-diwali-with-fishermen-at-versova-koliwada-assures-support-to-families/
या सहलीमध्ये गोकर्ण, मुरुडेश्वर, गुरुवायूर, रामेश्वरम, मदुराई, कन्याकुमारी, तिरुचिरापल्ली, कांचीपुरम आणि महाबलीपुरम या नऊ प्रमुख पर्यटनस्थळांचा समावेश आहे. या प्रवासातून पर्यटकांना अध्यात्म, संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
या प्रवासादरम्यान गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिर आणि ओम बीच, मुरुडेश्वर येथील भव्य शिवमंदिर आणि समुद्रकिनारा, गुरुवायूर मंदिर, रामेश्वरम येथील श्री रामनाथस्वामी मंदिर आणि धनुष्कोडी, मदुराई येथील मीनाक्षी मंदिर, कन्याकुमारी येथील कुमारी अम्मन मंदिर, विवेकानंद रॉक मेमोरियल, गांधी मंडपम आणि सनसेट पॉइंट यांना भेट दिली जाणार आहे. याशिवाय तिरुचिरापल्ली येथील श्री रंगनाथस्वामी मंदिर आणि तंजावर मंदिर, कांचीपुरम येथील कामाक्षी अम्मन मंदिर, एकाम्बरेश्वर मंदिर आणि श्री वरदराज पेरुमल मंदिर तसेच महाबलीपुरम येथील प्रसिद्ध शोर मंदिर आणि कृष्णाज बटरबॉल या ठिकाणांचाही समावेश आहे.
https://www.prahaar.in/2026/11/09/medical-miracle-in-mumbai-doctors-at-kem-hospital-have-saved-the-life-of-a-prematurely-born-baby-weighing-only-700-grams/
प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, मिरज आणि बेळगावी या स्थानकांवरून रेल्वेमध्ये चढण्याची व उतरण्याची सुविधा उपलब्ध असेल.
या पर्यटन पॅकेजचे प्रतिप्रवासी दर पुढीलप्रमाणे आहेत : इकॉनॉमी (स्लीपर क्लास) – ₹20,420, स्टँडर्ड (3 एसी) – ₹32,770 आणि कम्फर्ट (2 एसी) – ₹42,940 तसेच 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी विशेष पॅकेज दर उपलब्ध आहेत. या पॅकेजमध्ये रेल्वे प्रवास, हॉटेल निवास, शाकाहारी भोजन, बसद्वारे स्थानिक पर्यटन व वाहतूक व्यवस्था, प्रवास विमा, रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था आणि लागू असलेले कर यांचा समावेश आहे.
https://www.prahaar.in/2026/11/09/navi-mumbai-two-sisters-injured-in-firing-incident-referred-to-jj-hospital-one-undergoes-bullet-removal-surgery/
याप्रसंगी श्री गौरव झा, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी पश्चिम विभाग, मुंबई यांनी सांगितले की, “दक्षिण भारताचा समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा पर्यटकांना आरामदायी व संस्मरणीय पद्धतीने अनुभवता यावा, या उद्देशाने ‘टेम्पल ट्रेल्स ऑफ दक्षिण’ भारत गौरव पर्यटन रेल्वेची विशेष आखणी करण्यात आली आहे. अशा विशेष पर्यटन पॅकेजच्या माध्यमातून तीर्थयात्रा आणि पर्यटन प्रवाशांसाठी अधिक सुलभ, सोयीस्कर आणि किफायतशीर करण्याचा आयआरसीटीसीचा प्रयत्न आहे.”
रेल्वे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे भारत गौरव रेल्वे योजनेअंतर्गत सुमारे 33 टक्के सवलत देण्यात येत आहे. वरील पॅकेज दरांमध्ये ही सवलत समाविष्ट आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language