Hashtagintro

Gokul: भाजप गोकुळचं अध्यक्षपद का घेणार नाही? शिवसेना किंवा राष्ट्रवादीला का देणार? समजून घ्या

Gokul: भाजप गोकुळचं अध्यक्षपद का घेणार नाही? शिवसेना किंवा राष्ट्रवादीला का देणार? समजून घ्या

Gokul Chairman Election 2026: 500 कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या गोकुळ, कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदासाठी भाजपने मोठी खेळी खेळली आहे. सत्तासंघर्षात अगोदरच शासननियुक्त चार संचालकांचा डाव टाकून भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे मानले जात आहे. तर त्याचवेळी सतेज पाटील धुरंधर ठरू नयेत यासाठी गोकुळचं अध्यक्षपद मित्रपक्ष शिवसेना अथवा राष्ट्रवादीला देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. पण त्यामागे भाजपचं काय गणित आहे?

गोकुळचं अध्यक्षपद कुणाकडं?

ताज्या माहितीनुसार, गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना अथवा राष्ट्रवादी पक्षाकडे जाऊ शकतं. राष्ट्रवादीकडे अध्यक्षपद गेल्यास राजेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे अध्यक्षपद गेल्यास अजित नरके यांना संधी मिळू शकते. आता थोड्याचवेळात महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्यात याविषयीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे राजेश पाटील कोण?

गोकुळच्या अध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची याविषयीचा रात्रापासूनच महायुतीत खल सुरू आहे. थोड्याच वेळात महायुतीच्या घटक पक्षांची बैठक होत आहे. त्यात राष्ट्रवादीकडे गोकुळचं अध्यक्षपद गेल्यास राजेश पाटील यांची निवड होऊ शकते. ते चंदगडचे माजी आमदार आहेत. म्हाळेवाडी हे त्यांचे गाव आहे. गोकुळ, केडीसीसीचे संचालक, चंदगड खरेदी विक्री संघाचे अध्यक्षपद त्यांनी भुषवले आहे.

अजित नरके यांचे गोकुळच्या अध्य़क्षपदासाठी नाव चर्चेत

महायुतीत शिंदे शिवसेनेकडे गोकुळचं अध्यक्षपद जाणार असेल तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांच्या नावाची चर्चा आहे. मागच्या अनेक वर्षांपासून गोकुळचे संचालक म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. ते कोल्हापूरातील एक प्रमुख राजकारणी म्हणून ओळखले जातात. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

भाजप अध्यक्ष पदापासून का दूर?

गोकुळमध्ये चार शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे लोकांमध्ये रोषाची भावना आहे. जनमतावर परिणाम होऊ नये यासाठी भाजपने अध्यक्ष पदाच्या निवडीपासून तूर्तास चार हात दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. जनभावना लक्षात घेऊन भाजप हे अध्यक्षपद शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडे सोपवणार असल्याचे समोर येत आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language