
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्ताने सचिनने एक्सवरून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अवघ्या एका ओळीत सचिनने पत्नीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या एका छोट्या लाइनमधून सचिनने संपूर्ण नात्याची कहाणीच व्यक्त केली आहे. तू असल्याने घराला नेहमीच घरपण आलं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा, अंजली!, असं सचिनने म्हटलं आहे. सोबतच सचिनने लाल रंगाचा इमोजी पोस्ट केला आहे.
सचिन तेंडुलकर आणि अंजली यांची प्रेम कहाणी हटकेच राहिली आहे. ज्या वयात लोक स्वप्नांच्या पाठी धावतात त्या वयात सचिन तेंडुलकर मँचेस्टरमध्ये इंग्लंडच्या विरोधात शतक ठोकून जगाला मोहून टाकत होता. भारतात परत आल्यावर एअरपोर्टवर अशा खास व्यक्तीची ओळख होणार आहे की, जी आयुष्यभराची जीवनसाथी असेल हे सचिनला तेव्हा काय माहीत होतं? पहिली भेट, ऑटोग्राफसाठीचा उतावीळपणा, फोनवरून बोलणं, भेटण्याचे बहाणे आणि नंतर विवाह. तब्बल 36 वर्षाचं नातं सचिनच्या आयुष्यातील एक सुंदर अध्याय आहे.
Home has always meant a little more because you’re in it. Happy birthday, Anjali!
https://t.co/2S5h3HPziz
— Sachin Tendulkar (@sachin_rt) November 10, 2026
मुंबईत क्लिन बोल्ड
14 ऑगस्ट 1990 मध्ये हा सुखद प्रवास सुरू झाला. इंग्लंडच्या मॅनचेस्टरमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान कसोटी सामना होता. हा कसोटीतील शेवटचा दिवस होता. भारतीय संघाने पराभवाच्या छायेत होता. पण सचिनच्या शतकी खेळीने संघाला सावरलं. सचिनने नाबाद 119 धावा ठोकल्या. मनोज प्रभाकर सोबत 160 धावांची भागीदारी केली. भारताला पराभूत होण्यापासून वाचवलं होतं. सचिनचं त्याच्या कसोटी करिअरमधील हे पहिलं शतक होतं. ही शतकी खेळी त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरली. या खेळी नंतर तो भारतात परतला.
ऑटोग्राफसाठी धावपळ
इंग्लंड दौऱ्याहून आल्यावर सचिनची अंजलीसोबतची पहिली भेट मुंबई एअरपोर्टवर झाली. अंजली तिच्या आईला घेण्यासाठी आली होती. तिथे असलेली तिची मैत्रीण डॉ. अपर्णा हिने सचिनला ओळखलं. आणि इंग्लंडमध्ये शतकी खेळी करणारा हाच तो क्रिकेटर असल्याचं तिने अंजलीला सांगितलं. त्यानंतर सचिनचा ऑटोग्राफ घेण्यासाठी अंजली धावतच गेली. सचिन लाजाळू होता. तो खास काही बोलला नाही. भाऊ अजित आणि नितीनसोबत कारमध्ये बसून निघून गेला. यावेळी सचिनला पाहिल्यानंतर अंजली तिच्या आईला घ्यायला आल्याचंच विसरली होती.
पत्रकार बनून…
विमानतळावरची भेट संपली. पण अंजलीला सचिनला पुन्हा भेटायची इच्छा होती. तिने मित्रांकडून सचिनचा नंबर मिळवला. त्यानंतर दोघांचं बोलणं सुरू झालं. तिने एअरपोर्टवरची ओळख सांगितली. तेव्हा सचिननेही हसून उत्तर दिलं. मीही तुला पाहिलं होतं. तू माझ्या मागे धावत होतीस, असं सचिन म्हणाला. त्यानंतर फोनवरचं बोलणं हळूहळू वाढलं आणि दोघे प्रेमात पडले. अंजलीने एक मुलाखत दिली होती. त्यात तिने पत्रकार बनून सचिनच्या घरी कशी पोहोचली होती हे सांगितलं होतं. सचिनची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. त्यामुळे सचिनला भेटणं मुश्किल झालं होतं, म्हणून तिने हा मार्ग निवडला होता.
एकदा तर दोघांनी रात्री 8.30 वाजता भेटण्याचं ठरवलं होतं. सचिन भेटायला आलाही होता. पण अंजली घरातून बाहेर पडू शकली नव्हती. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे दोघांचे संपर्क होऊ शकला नव्हता. ग्रँट मेडिकल कॉलेज, जेजे हॉस्पिटल आणि लोणावळ्यातील बंगल्यावरही दोघांच्या अनेकदा भेटी झाल्या आहेत. दोघांनी पुढे 24 मे 1995 रोजी लग्न केलं. त्यानंतर त्यांना सारा आणि अर्जुन ही दोन मुले झाली.
Source: TV9 Marathi National

https://t.co/2S5h3HPziz