Hashtagintro

Rajinikanth style – Malaysian PM | मलेशियाच्या पंतप्रधानांनी 'रजनीकांत स्टाइल'मध्ये दिल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा!

Malaysian Prime Minister Anwar Ibrahim  दिवाळीच्या निमित्ताने जगभरातील अनेक प्रमुख नेत्यांनी भारताला आणि जगभरातील भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, मलेशियातून आलेल्या एका अनोख्या संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्या खास शैलीत एक व्हिडिओ बनवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ते अगदी रजनीकांत यांच्यासारखा गॉगल लावताना, गाडीतून उतरताना आणि तमिळ भाषेत बोलताना दिसत आहेत. त्यांचा हा हटके अंदाज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

मुरुक्कू खात म्हटले ‘दीपावली नलवाल्थुक्कल’

सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये अन्वर इब्राहिम कंटेंट क्रिएटर देवराज डेव्हिडसोबत दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला अन्वर इब्राहिम एका दमदार आणि स्टायलिश अंदाजात कारमधून खाली उतरतात. ते देवराजसोबत ते दिवाळी साजरी करताना दिसतात. व्हिडिओमध्ये दोघे मिळून फराळातील ‘मुरुक्कू’ खातात (महाराष्ट्रातील चकलीसारखा पदार्थ) आणि तमिळ भाषेत ‘दीपावली नलवाल्थुक्कल’ (दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा) असे म्हणताना दिसतात. त्‍यानंतर रजनीकांत यांचे मफरल खांद्यावर टाकण्याची स्टाईल करतात. मलेशियात भारतीय वंशाची मोठी लोकसंख्या असून, त्यातील सुमारे ८५ टक्के लोक दक्षिण भारतीय वंशाचे आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडिओ चर्चा होत आहे.

विविधतेत एकता टिकवण्याचे आवाहन

सोशल मीडियावरील आपल्या संदेशात पंतप्रधान अन्वर इब्राहिम म्हणाले की, “दिवाळीच्या या सणाने देशातील वैविध्यपूर्ण समाजात ऐक्य अधिक दृढ केले पाहिजे. ज्या समाजात वेगवेगळ्या संस्कृती आणि परंपरा एकत्र नांदतात, तिथे परस्पर आदर, सामंजस्य आणि एकमेकांमधील फरक स्वीकारण्याची भावना बळकट होणे आवश्यक आहे.”

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language