आयपीएल 2027 स्पर्धेसाठी अवघ्या काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेपूर्वी मिनी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. असं असताना ट्रेड विंडोच्या माध्यमातून खेळाडूंची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. या ट्रेड विंडोत हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंग यांच्या आदलाबदलीची जोरदार चर्चा होती. अखेर या चर्चेवर शिक्कामोर्तब झालं आहे. हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून, तर अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे. हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद होतं. पण आता त्याला पंजाब किंग्समध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळावं लागणार आहे. तर मुंबई इंडियन्सला अर्शदीप सिंगच्या रुपाने टी20 स्पेशालिस्ट गोलंदाज मिळाला आहे. तसं पाहिलं तर ही ट्रेड डिल हार्दिक पांड्याला फायद्याची ठरली ठआहे. कारण या ट्रेड डिलमध्ये हार्दिक पांड्याच्या रकमेत वाढ झाली. तर अर्शदीप सिंगला आहे त्या किमतीत मुंबई इंडियन्स संघात जावं लागलं आहे.
हार्दिक पांड्याच्या रकमेत वाढ
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ हार्दिक पांड्याला 16.35 कोटी इतकी रक्कम देत होता. तर पंजाब किंग्स अर्शदीप सिंगसाठी 18 कोटी मोजत होती. या ट्रेड डिलमध्ये अर्शदीप सिंग मुंबई इंडियन्सकडून 18 कोटी मिळणार आहे. म्हणजेच त्याच्या रकमेत काहीही वाढ झालेली नाही. पण हार्दिक पांड्या पंजाब किंग्सकडून 18 कोटी रक्कम मिळेल. म्हणजेच त्याच्या आयपीएल उत्पन्नात 1.65 कोटींची वाढ झाली आहे. हार्दिक पांड्या आयपीएल 2015 मध्ये 10 लाखांच्या बेस प्राईसवर मुंबई इंडियन्स संघात सामील झाला होता. 2017 पर्यंत त्याला हीच रक्कम मिळाली. त्यानंतर 2018 च्या मेगा लिलावापूर्वी त्याला मुंबई इंडियन्सने 18 कोटी दिले. ही रक्कम 2021 पर्यंत कायम होती. त्यानंतर आयपीएल 2022 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात टायटन्समध्ये गेला आणि त्याला 15 कोटी मिळाले. 2023 पर्यंत गुजरात टायटन्सचा भाग होता. 2024 मध्ये ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा संघात घेतलं आणि 15 कोटी दिले. त्यानंतर 2025 आणि 2026 मध्ये त्याला मुंबई इंडियन्सकडून 16.35 कोटी मिळाले.
https://www.prahaar.in/2026/11/11/ipl-2027-mega-auction-hardik-pandya-to-punjab-kings-arshdeep-singh-to-mumbai-indians-18-crore-trade/
The trade confirmation you have been waiting for is HERE!
Two marquee #TeamIndia stars, two franchise and a blockbuster trade 🎇
Hardik Pandya heads to @PunjabKingsIPL and Arshdeep Singh moves to @mipaltan.
📌 Hardik will join #PBKS at a revised fee of INR 18 crore, up from 16.5 crores.
📌 Arshdeep will join #MI at his existing fee of INR 18 crore
Details ▶️ https://t.co/i4RpaGg2BE
#TATAIPL2027
— IndianPremierLeague (@IPL) November 11, 2026
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स भाग असताना मिळवले चार जेतेपद
हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना चार वेळा जेतेपद मिळवलं आहे. त्यानंतर 2022 मध्ये कर्णधार म्हणून गुजरात टायटन्सचा भाग झाला आणि पहिल्याच पर्वात जेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर 2023 मध्ये त्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने पुन्हा अंतिम फेरी गाठली. पण उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर 2024 मध्ये मुंबई इंडियन्स संघात आला, पण छाप काही सोडता आली नाही. पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने तीन पर्व खेळली. त्यापैकी एकाच पर्वात पात्रता फेरी गाठू शकले. पण उर्वरित दोन पर्वात मुंबई इंडियन्स संघाची स्थिती एकदम नाजूक होती.
Source: Prahaar News
