
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काउचपासून ते त्यांच्या गरिबीपर्यंत सर्व गोष्टींबद्दल भाष्य केलं आहे. मात्र, एका अभिनेत्रीनं असा खुलासा केला आहे, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला होता. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाणारी शर्लिन चोप्रा आहे. शर्लिन अनेकदा बेधडक वक्तव्य करते. असंच अभिनेत्रीनं एकदा बेधडक वक्तव्य केलेलं आणि स्वतःबद्दल महत्वपूर्ण खुलासा केला होता.
शर्लिन अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपड्यांमध्ये दिसते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि तिच्या फोटो व व्हिडिओंद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याशिवाय, शर्लिन तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. एकदा, तिच्या संघर्षाच्या दिवसांबद्दल बोलताना शर्लिनने एक धक्कादायक खुलासा केला होता. ‘बॉलिवूड लाईफ’नुसार, शर्लिनचे तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध होते.
काय म्हणालेली शर्लिन चोप्रा?
अभिनेत्रीनं सांगितलं की, तिनं हे पैशांसाठी केलं होतं. सोशल मीडियावर शर्लिननं लिहिलेलं की, ‘मला पैशांच्या बदल्यात शारीरिक संबंधांसाठी अनेक वेळा विचारण्यात आलंय. मी यापूर्वीही पैशांसाठी शारीरिक संबंध ठेवले आहेत. हा खुलासा मी स्वतःची प्रतिमा बिचारी किंवा चांगली किंवा वाईट करण्यासाठी करत नाहीये. मी फक्त एवढंच सांगतेय की, आजही लोक माझ्याशी शारीरिक संबंधांसाठी संपर्क साधतात, पण मी आता त्या गोष्टी करत नाही.’
View this post on Instagram
अभिनेत्रीनं पुढे लिहिलं होतं की, आता अशा गोष्टींसाठी तिच्याशी कोणीही संपर्क साधू नये. तसेच, तिनं आधी पैशांसाठी ज्यांच्याबरोबर संबंध ठेवले होते, ते लोक तिला आठवत नाहीत. चित्रपटसृष्टीत काम मिळवणं कठीण होतं आणि मुंबईसारख्या शहरात टिकून राहण्यासाठी पैशांची गरज होती, म्हणून हा पर्याय निवडल्याचं तिनं सांगितलं होतं. तसेच शर्लिननं स्वतःच्या कृतीचं अजिबात समर्थन केलं नव्हतं.
दरम्यान, शर्लिन ‘कामसूत्र 3D’, ‘खेल’, ‘चमेली’ आणि ‘पौरुषपूर’ यांसारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
Source: TV9 Marathi National
