तुम्हाला गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारची जोखीम नकोय. तसेच तुम्हाला सुरक्षित आणि चांगला परतावा हवाय. तर तुमच्यासाठी फिक्स डिपॉजिट चांगला पर्याय आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अनेक बँका एफडीच्या व्याज दरात बदल करत आहे.
काही बँकांनी विशिष्ट कालावधीच्या एफडीच्या दरात वाढ केली आहे. तसेच बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु बँकेकडे निश्चित रोख रक्कम जमा होताना दिसत नसल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे अनेक बँका लवकरच एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेचा निर्णयांचा इतर बँकेवर परिणाम होताना दिसत आहे. त्यांच्या निर्णयांचा एफडीच्या व्याजदरावर देखील परिणाम होत आहे. त्यामुळे एफडीवरील व्याजदर वाढवून बँकेत अधिक रक्कम जमा होईल. त्यामुळे ग्राहकांना कर्ज देणे सोपे होईल, असा बँकांचा विचार आहे.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, 15 ऑक्टोबर 2026 पर्यंत बँकांचं कर्ज हे आर्थिक वर्षाच्या तुलनेत 18.2 टक्क्यांनी वाढलं. बँकांचं एकूण कर्ज 227.43 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे. बँकेतील एफडी 16.7 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
बँका ज्या वेगाने व्यक्ती आणि कंपन्यांना कर्ज देत आहेत. तितक्याच वेगाने त्यांनी एफडी मिळत नाहीये. त्यामुळे बँकांना नवीन ठेवींची गरज आहे. त्यामुळे बँका बचत जमा व्हावी, यासाठी एफडीवर चांगले व्याजदर द्यायला तयार असल्याची माहिती हाती आहे.
Source: TV9 Marathi National





