Hashtagintro

धक्कादायक! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला क्रिकेटरने उचललं टोकाचं पाऊल; 2 तरुणांवर गंभीर आरोप

धक्कादायक! BCCI अंडर-19 संघात निवड झालेल्या महिला क्रिकेटरने उचललं टोकाचं पाऊल; 2 तरुणांवर गंभीर आरोप

क्रिकेटच्या मैदानावर देशाचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका महिला क्रिकेटपटूचा प्रवास अवघ्या 17 व्या वर्षी संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अंडर-19 महिला संघात नुकतीच निवड झालेल्या नंदिनीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. तेलंगणातील विकाराबाद इथं तिने स्वत:ला संपवलं. या घटनेमुळे क्रीडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. नंदिनीच्या कुटुंबीयांनी दोन तरुणांवर छळ केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

कोण होती नंदिनी?

नंदिनी ही तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यातील यलाल मंडळातील संगय्यापल्ली गावची रहिवासी होती. ती शिक्षणासाठी आणि क्रिकेटचे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी विकाराबाद शहरातील मधु कॉलनी इथं तिच्या आजीकडे राहत होती. अभ्यासासोबतच ती क्रिकेटचा सराव करत होती. तिच्या मेहनतीला यश मिळालं आणि नुकतीच तिची BCCI अंडर-19 महिला क्रिकेट संघात निवड झाली होती. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण होतं. भविष्यात भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न तिने पाहिलं होतं. मात्र, तिच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दोन तरुणांवर कुटुंबीयांचे गंभीर आरोप

नंदिनीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी अनिल आणि कृष्णा नावाच्या दोन तरुणांवर गंभीर आरोप केले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अनिल हा गेल्या काही दिवसांपासून प्रेमाच्या नावाखाली नंदिनीचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तर कृष्णा हा त्याला मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित छळामुळे नंदिनी मानसिक तणावात होती, असा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे.

कुटुंबीयांचं रस्त्यावर उतरून आंदोलन

नंदिनीच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. दोन्ही तरुणांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

विकाराबाद पोलिसांनी नंदिनीच्या वडिलांच्या तक्रारीवरून संशयास्पद मृत्यूची नोंद केली आहे. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी तिचा मोबाईल फोन ताब्यात घेतला असून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तिचx इन्स्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप अकाउंट तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोणी त्रास दिला होता का, याचाही शोध घेतला जात आहे.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language