Hashtagintro

U19 Asia Cup Aaryavir Sehwag : सेहवागचा मुलगा आर्यवीरने अंडर 19 आशिया कपच्या इतिहासात बनवला नवीन रेकॉर्ड, त्याने टुर्नामेंट गाजवली

U19 Asia Cup Aaryavir Sehwag : सेहवागचा मुलगा आर्यवीरने अंडर 19 आशिया कपच्या इतिहासात बनवला नवीन रेकॉर्ड, त्याने टुर्नामेंट गाजवली

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागचं अंडर 19 टीममध्ये सिलेक्शन झाल्यापासून अनेकांना त्याच्या प्रदर्शनाची उत्सुक्ता होती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध यूथ वनडे सीरीजमध्ये आर्यवीरने आपल्या बॅटिंगची झलक सुद्धा दाखवली होती. पण तो काय दर्जाचा फलंदाज आहे, हे त्याने अंडर 19 आशिया कपमध्ये दाखवून दिलं. वीरेंद्र सेहवाग आक्रमक, स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जायचा. आर्यवीरने सुद्धा वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अंडर 19 आशिया कपमध्य सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड करुन इतिहास रचला आहे. ओमानमध्ये ही अंडर 19 आशिया कप स्पर्धा होत आहे. आर्यवीर सेहवागकडून भरपूर अपेक्षा होत्या. त्याने निराशही केलं नाही. आपल्या वडिलांप्रमाणेच ओपनिंगची जबाबदारी संभाळत आर्यवीरने टुर्नामेंटच्या प्रत्येक सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली. पाकिस्तान विरुद्ध फायनलमध्ये वेदना होत असूनही त्याने अर्धशतक झळकवलं. टीमला दमदार स्टार्ट दिली. त्याचवेळी त्याने सर्वाधिक धावांचा रेकॉर्डही केला.

शनिवारी फायनलमध्ये आर्यवीर 58 धावांची दमदार इनिंग खेळला. अंडर 19 आशिया कपच्या या एडिशनमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आर्यवीरने या आशिया कपमध्ये पाच डावात 361 धावा केल्या. हा एक नवीन रेकॉर्ड आहे. त्याने एक शतक आणि तीन हाफ सेंच्युरी झळकवल्या. पाच पैकी चार डावात त्याने 50 पेक्षा जास्त धावा केल्यात. त्याची सरासरी 90.25 आणि स्ट्राइक रेट 95.50 चा होता. आपल्या वडिलांप्रमाणे आर्यवीरने सुद्धा चौकारांनी धावा वसूल केल्या. त्याने 38 फोर आणि 16 सिक्स लगावल्या.

उस्मानच्या पाच इनिंगमध्ये 345 धावा

या आधी हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या समीर मिन्हासच्या नावावर होता. त्याने मागच्या आशिया कपमध्ये 294 धावा केल्या होत्या. आर्यवीरने सेमीफायनल मॅचमध्येच हा रेकॉर्ड मोडला होता. पण फायनलमध्ये पाकिस्तानच्या उस्मान खानने शतक झळकवून आर्यवीरला पाठी टाकून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. उस्मानच्या पाच इनिंगमध्ये 345 धावा झाल्या. फायनलमध्ये पुन्हा एकदा आर्यवीरची कमाल पहायला मिळाली. त्याने उस्मानला मागे टाकून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला, इतिहास रचला. आर्यवीरला फायनलमध्ये दुखापत होऊनही त्याने अर्धशतक झळकावलं.

 

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language