Hashtagintro

मुंबईसह पुण्यामध्ये प्रतिबंधित खाद्यपदार्थांवर FDA ची कारवाई, लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबई: अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) शुक्रवारी राज्यामध्ये कारवाईदरम्यान न्यूट्रास्युटिकल्स, आरोग्य पूरक आणि विशेष आहारासाठीच्या खाद्यपदार्थांचा व्यवहार करणाऱ्या 17 आस्थापनांची तपासणी करून 1 कोटी 90 लाख 83 हजार 531 किंमतीचा अन्नपदार्थ जप्त केले. या कारवाईमध्ये, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) नाकारलेल्या घटकांचा वापर झाल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर 1.38 कोटी रुपये किंमतीचे आरोग्य पूरक जप्त करणे, स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पुण्यातील दोन रेस्टॉरंटचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर, कोल्हापूरमध्ये 45.95 लाख रुपये किमतीचे 21,004 लीटर संशयित खाद्यतेल जप्त करण्यात आले. एफडीएने गुटखा आणि सुगंधी पान मसाला यांसारख्या प्रतिबंधित खाद्यपदार्थांची विक्री आणि वाहतूक केल्याप्रकरणी मुंबईतील सहा पान दुकाने आणि पुण्यातील एका वाहनावरही कारवाई करत, पाच गुन्हे दाखल केले.
https://www.prahaar.in/2026/11/14/mumbai-kandivali-crime-news-14-year-old-girl-was-sexually-assaulted-by-four-individuals-accused-also-threatened-to-make-a-video-of-the-incident-go-viral/
मुंबईत, FDAने दहिसर पूर्व, धारावी, गोरेगाव पश्चिम आणि अँटॉप हिल येथील सहा पान दुकानांमधून 31,149 रुपये किंमतीचे प्रतिबंधित खाद्यपदार्थ जप्त केले. दहिसर पूर्वेकडील कलश पान शॉप आणि वचन पान शॉप, धारावीतील महाराष्ट्र पान शॉप आणि तळपत्री पान शॉप, गोरेगाव पश्चिमेकडील गोरखनाथ पान शॉप आणि अँटॉप हिलमधील कालिंद्री पान शॉप या दुकानांवर कारवाई करत दुकानातील प्रतिबंधित खाद्यपदार्थ जप्त केले आहे. शिवाय, पुण्यातही FDAने धडक कारवाई केली आहे. पुण्यामध्ये, अधिकाऱ्यांनी 3,61,270 रुपये किंमतीचा साठा आणि 2 लाख रुपये किंमतीचे एक वाहन जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या साठ्याचे आणि वाहनाची एकूण 5,92,419 ​​रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
न्यूट्रास्युटिकल्स, हेल्थ सप्लिमेंट्स आणि विशेष आहारासाठीच्या खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या 17 आस्थापनांच्या तपासणीदरम्यान, एफडीएला मॅग्नेशियम ॲसिटिल टॉरेट आणि निकोटिनामाइड मोनोन्यूक्लिओटाइड यांचा वापर आढळून आला. विभागाने सांगितले की, एफएसएसएआयने ३ जून रोजीच्या निर्देशांनुसार हे घटक नाकारले आहेत. FDAने 1 कोटी 38 लाख 95 हजार 852 रुपये किंमतीचा आरोग्य पूरक उत्पादने आणि संबंधित उत्पादने जप्त केली आहेत. विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्पादकांनी आवश्यक उत्पादन मंजुरीशिवाय घटक असलेली उत्पादने तयार केली होती, तर विक्रेते त्यांच्या परवान्यांवर संबंधित खाद्य श्रेणीचा उल्लेख न करता त्यांची विक्री करत होते. नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, तपासणीमध्ये काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/14/good-news-for-passengers-after-csmt-dmart-launches-modern-and-swanky-toilets-at-thane-and-kalyan-railway-stations/
तपासणीमध्ये असलेल्या उत्पादनांत ॲसिटिल- एल- कार्निटाइन, मॅग्नेशियम ॲसिटिल टॉरेट आणि सोडियम बेंझोएट असलेली रेजुव्हान्स कॅप्सूल; बीटा- निकोटिनमाइड मोनोन्यूक्लिओटाइड आणि सल्फोराफेन असलेली अल्टिब्रेन-एस कॅप्सूल; आणि मॅग्नेशियम एल-थ्रिओनेट, मॅग्नेशियम ॲसिटिल टॉरेट आणि सोडियम बेंझोएट असलेल्या मॅग्लाडेन्स टॅब्लेट यांचा समावेश होता. एफडीएने मॅग्नेशियम एल-थ्रिओनेट, युरिडिन मोनोफॉस्फेट आणि फॉस्फॅटिडिलसेरीन असलेले एक मॅग्लाडेन्स सिरप देखील ओळखले. इतर उत्पादनांमध्ये बीटा-निकोटिनमाइड मोनोन्यूक्लिओटाइड, पेंटाडेकॅनोइक अॅसिड आणि एल-एर्गोथायोनिन असलेल्या EQOQ गोळ्या, तसेच शिताके मशरूमचा अर्क असलेल्या गोळ्यांचा समावेश होता.
एका स्वतंत्र कारवाईमध्ये, एफडीएने कोल्हापूर जिल्ह्यातील निमशीरगाव येथील ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडमधून 45 लाख 95 हजार 260 किंमतीचे 21,004 लिटरचे संशयित खाद्यतेल जप्त केले आहे. FDA कडून शुद्ध पामोलिन, मोहरीचे तेल, सूर्यफूल तेल, सोयाबीन तेल आणि कापसाच्या बियांचे तेल यासह विविध प्रकारच्या खाद्यतेलाचे नमुने गोळा करून चाचणीसाठी नेले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच FDA कडून कोल्हापूरातील ह्या सुपरमार्टवर कारवाई करण्यात येणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language