Hashtagintro

जमिनीवर बसून मटणाचे जेवण, सूर्यकुमार यादव आणि सरफराज खान यांचा साधा अंदाज व्हायरल

मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेदरम्यान मुंबईचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याचा सहकारी सरफराज खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मोठ्या हॉटेलमधील जेवणाऐवजी या दोघांनी एका साध्या घरातील पारंपरिक मटणाच्या जेवणाचा आनंद घेतला आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोघेही मुंबईच्या जर्सीमध्ये दिसत आहेत. एका छोट्याशा स्वयंपाकघरात जमिनीवर बसून ते जेवण करत आहेत. सूर्यकुमार यादव याने माणिक नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली.

माणिक यांनीच हे मटणाचे जेवण बनवले होते. त्यांच्या बाजूला दुसरी एक व्यक्ती पीठ मळून तव्यावर गरमागरम पोळ्या बनवताना दिसत आहे.जेवण करताना सरफराज खानने घरगुती जेवणाचे मनापासून कौतुक केले. जेवण इतके चविष्ट आहे की खाणे थांबवून बोलणेही अवघड जात आहे, असा गंमतीशीर टोला त्याने लगावला. व्हिडिओच्या शेवटी सूर्यकुमार यादवने बंगाली भाषेत स्वयंपाक करणाऱ्यांचे आभार मानले.क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक खेळासाठी ओळखले जाणारे हे दोन्ही खेळाडू मैदानाबाहेर मात्र अगदी साध्या पद्धतीने जेवणाचा आनंद घेताना दिसल्याने चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

 

View this post on Instagram

 
A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

स्टार असूनही जमिनीवर बसून, घरगुती जेवणाचा आनंद घेण्याचा त्यांचा हा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.सोशल मीडियावर अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी घरगुती जेवणाची चव वेगळीच असते, असे म्हटले आहे, तर काहींनी दोन्ही खेळाडूंच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.सध्या मुंबईचा संघ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळत असून मैदानावरील कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील हे क्षणही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language