Hashtagintro

'आम्ही तुम्हाला शोधून काढू'; इराणकडून दोन अमेरिकन नौदल अधिकाऱ्यांना थेट धमकी

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. इराणने अमेरिकन नौदलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना उघडपणे धमकी दिली आहे. दक्षिण आफ्रिकेतील इराणच्या दूतावासाने सोशल मीडियावर पोस्ट करून या दोन्ही अधिकाऱ्यांना शोधून काढण्याचा इशारा दिला आहे. इराणच्या दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली. त्यावर केवळ चार शब्द लिहिले होते – ‘आम्ही तुम्हाला शोधून काढू.’ या पोस्टमध्ये दोन अमेरिकन अधिकाऱ्यांना गुन्हेगार म्हणून संबोधण्यात आले होते. हे दोन्ही अधिकारी कोण आहेत, याची माहितीही दूतावासाने दिली आहे. कमांडर ली आर. टेट हे यूएसएस स्प्रान्स या युद्धनौकेचे कमांडिंग ऑफिसर आहेत, तर लेफ्टनंट कमांडर जेफ्री ई. यॉर्क हे त्याच युद्धनौकेचे कार्यकारी अधिकारी आहेत.
२९ मार्चच्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, या दोन अधिकाऱ्यांनी तीन वेळा टोमाहॉक क्षेपणास्त्रे डागण्याचे आदेश दिले होते. फेब्रुवारी महिन्यात इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे एक क्षेपणास्त्र मिनाब येथील शजरे तैय्यबेह शाळेवर कोसळले होते. या हल्ल्यात १२३ मुलांसह किमान १६८ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणकडून करण्यात येत आहे. याच हल्ल्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/11/16/protests-in-the-philippines-against-trumps-visit-demonstrators-cause-a-stir-on-the-streets-of-manila/
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अमेरिकन अधिकाऱ्यांवर हल्ला न करण्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या एका दिवसात इराणकडून ही धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणला इशारा देताना म्हटले होते की, जर एखाद्या वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याची हत्या झाली, तर इराणचे अस्तित्व फार काळ टिकणार नाही.
दरम्यान, आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांना तेहरानशी संबंधित व्यक्तींकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वॉशिंग्टनमधील त्यांच्या निवासस्थानावरून हलवून एका लष्करी तळावर ठेवण्यात आले आहे. इराणच्या या नव्या धमकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या घटनेकडे लक्षपूर्वक पाहिले जात आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language