Hashtagintro

Sourav Joshi Vlogs: सौरभ जोशीची व्हिएतनाम ट्रीप चर्चेत! 2 दिवसांच्या हॉटेलसाठी मोजले लाखो रुपये?

Gen Z च्या आवडत्या स्टार्सपैकी एक म्हणजे सौरभ जोशी. तो कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. त्याचे व्लॉग्स सर्व वयोगटातील लोकांना आवडतात. तो भारतातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत व्लॉगर्सपैकी एक आहे. त्याच्या यशामागील एक प्रमुख कारण म्हणजे दररोज व्लॉग्स तयार करून आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करण्याची त्याची सवय. नुकताच सौरव त्याची जोडीदार अवंतिका आणि दोन भाऊ, पियुष आणि साहिल यांच्यासह पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रीपवर गेला होता. हे चौघेही व्हिएतनामला फिरायला गेले होते. या ट्रिपची सुरुवात विमानतळावरून होते, जिथे त्या चौघांना आराम करण्यासाठी खासगी लाउंज दिला जातो. त्यानंतर विमानतळावरील कर्मचारी त्यांना एका गाडीतून घेऊन जातात.
व्हिएतनाममध्ये पोहोचल्यावर अवंतिकाने एटीएममधून १० दशलक्ष व्हिएतनामी डाँग काढले. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ३६.५ हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर सौरव अवंतिका आणि आपल्या भावांसोबत एका हॉटेलमध्ये गेला, जिथे हे कुटुंब दोन दिवस राहिले. या दोन दिवसांच्या वास्तव्याचा खर्च अंदाजे १७.५ दशलक्ष व्हिएतनामी डाँग असल्याचा अंदाज आहे. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर हे चौघे रात्रीच्या बाजाराला भेट देतात. तिथे ते खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करतात आणि बाजाराचा आनंद घेतात. त्यानंतर ते शहराच्या रस्त्यांवर रात्री फिरण्यासाठी रिक्षाने प्रवास करतात.
https://www.prahaar.in/2026/11/16/a-treasure-trove-of-sachins-memories-at-wankhede-an-opportunity-to-view-26-historic-bats-batography-exhibition-inaugurated/
आपली ही सफर संपवून ते हॉटेलवर परत येतात आणि एका रेस्टॉरंटमधून जेवण मागवतात. सौरवच्या व्लॉगमध्ये त्याच्या प्रवासातील प्रत्येक लहान मोठा क्षण टिपलेला असतो. विमानतळापासून ते हॉटेल आणि रात्रीच्या बाजारापर्यंत तो आपल्या कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण चित्रित करतो. यामुळेच त्याचे दर्शक केवळ त्याचा प्रवास पाहत नाहीत तर त्यांना असे वाटते की ते स्वतः त्याच्यासोबत प्रवास करत आहेत.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language