Hashtagintro

जगात हाहाकार! होर्मुज खाडीत नको तेच घडले, भारतात एलपीजीसह गॅसच्या किंमती..

जगात हाहाकार! होर्मुज खाडीत नको तेच घडले, भारतात एलपीजीसह गॅसच्या किंमती..

पश्चिम आशियात मोठा संघर्ष सुरू आहे. अमेरिका, इस्त्रायल यांच्याकडून इराणविरोधात मोठे युद्ध पुकारण्यात आले. मात्र, या युद्धाचा परिणाम फक्त तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही. भारतासह अन्य देशांना या परिणामांना सामोरे जावे लागले. भारतात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आल्याने जागतिक पातळीवर कच्च्या तेलाची मोठी समस्या निर्माण झाली. त्यातच आता एक मोठी घटना घडली आहे. ओमानजवळील स्ट्रेट ऑफ होर्मुजमधून जाणारे एक तेल टँकर एका नौदल सुरुंगावर आदळल्यामुळे त्याला आग लागली. त्यानंतर एकच भडका उडाला. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्सने सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली आहे.

24 तासांत या भागात जहाजांवर झालेला हा अशा प्रकारचा चौथा हल्ला असल्याची माहिती आहे. पुन्हा एकदा होर्मुज खाडीत तणाव वाढताना दिसत आहे. इराणच्या नौदलानेही या घटनेला दुजोरा दिला आहे. या स्फोटानंतर टँकरचे मोठे नुकसान झाले. मात्र, जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असल्याचीही माहिती मिळत आहे.

यूकेएमटीओच्या माहितीनुसार, ओमानजवळ होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरवर हल्ला झाला. या घटनेनंतर जहाज थांबले. जहाजाच्या इंजिन रूमला आग लागली आहे. जहाजावरील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. मात्र, जहाजाचे नेमके किती नुकसान झाले, याबाबत अधिकची माहिती ही मिळू शकली नाही. मात्र, या घटनेनंतर भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे.

इराणच्या नौदलानेही या घटनेबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, संबंधित तेल टँकर एका प्रतिबंधित सागरी क्षेत्रातून जात होते. तिथे नेव्हिगेशन प्रणाली होती. त्यामुळे हा स्फोट झाला. इराणने अनेक भागात होर्मुज खाडीत बॉम्बच्या सुरंग टाकल्या आहेत. इराणकडून दिला जाणारा सुरक्षित मार्गच वापरावा हे त्यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे. त्याच हा भीषण स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. होर्मुज खाडीत असाच तणाव राहिला तर भविष्यात भारतात एलपीजी गॅससह तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language