Hashtagintro

आज महाराष्ट्रात काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? तेल कंपन्यांचे 42,000 कोटी रुपयांचे नुकसान

आज महाराष्ट्रात काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर? तेल कंपन्यांचे 42,000 कोटी रुपयांचे नुकसान

कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची आशा पुन्हा एकदा मावळली आहे. दरम्यान, अवघ्या दोन दिवसांपूर्वीच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी असे स्पष्ट केले होते की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत लगेचच कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. अशा परिस्थितीत, नेहमीप्रमाणेच आज सकाळी 6 वाजता भारतातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

महाराष्ट्रातील पेट्रोलचे दर

अहमदनगर – ₹112.41, अकोला – ₹112.73, अमरावती – ₹112.81, औरंगाबाद – ₹112.08, भंडारा – ₹112.59, बीड – ₹112.45, बुलढाणा – ₹112.63, चंद्रपूर – ₹112.58, धुळे – ₹112.19, गडचिरोली – ₹112.95, गोंदिया – ₹113.04, बृहन्मुंबई – ₹111.21, हिंगोली – ₹113.17, जळगाव – ₹112.57, जालना – ₹113.21, कोल्हापूर – ₹112.60, लातूर – ₹112.61, मुंबई – ₹111.21, नागपूर – ₹111.80, नांदेड – ₹113.18, नंदुरबार – ₹112.48, नाशिक – ₹112.24, उस्मानाबाद – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹112.02, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.13, सातारा – ₹111.88, सिंधुदुर्ग – ₹113.17, सोलापूर – ₹111.85, ठाणे – ₹111.31, वर्धा – ₹112.38, वाशिम – ₹112.63, यवतमाळ – ₹113.17

महाराष्ट्रातील डिझेलचे दर

अहमदनगर – ₹99.06, अकोला – ₹99.40, अमरावती – ₹99.47, औरंगाबाद – ₹98.72, भंडारा – ₹99.24, बीड – ₹99.11, बुलढाणा – ₹99.28, चंद्रपूर – ₹99.26, धुळे – ₹98.84, गडचिरोली – ₹99.61, गोंदिया – ₹99.66, बृहन्मुंबई – ₹97.83, हिंगोली – ₹99.83, जळगाव – ₹99.20, जालना – ₹99.87, कोल्हापूर – ₹99.25, लातूर – ₹99.21, मुंबई – ₹97.83, नागपूर – ₹98.48, नांदेड – ₹99.83, नंदुरबार – ₹99.13, नाशिक – ₹98.89, उस्मानाबाद – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.66, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83, सांगली – ₹98.80, सातारा – ₹98.53, सिंधुदुर्ग – ₹99.83, सोलापूर – ₹98.52, ठाणे – ₹97.97, वर्धा – ₹99.05, वाशिम – ₹99.28, यवतमाळ – ₹99.83

तेल कंपन्यांना 42,000 कोटी रुपयांचा तोटा

चेन्नईच्या मीनाम्बक्कम विमानतळावर पत्रकारांशी बोलताना राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील सुरू असलेला संघर्ष आणि पेट्रोलियम पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे तेल कंपन्यांना ४२,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. इंधनाचे दर कमी करण्यापूर्वी, तेल कंपन्यांना झालेल्या या तोट्याचा हिशोब करावा लागेल. ते म्हणाले, “आम्हाला नक्कीच असे वाटेल की दर उद्याच्या उद्या कमी व्हावेत, परंतु तांत्रिकदृष्ट्या पाहता, सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नाही.”

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language