Hashtagintro

Online Business : ना मोठं ऑफिस, ना मोठं शहर! 20 वर्षांच्या तरुणाने घरातून उभा केला 2 कोटींचा व्यवसाय

Online Business : ना मोठं ऑफिस, ना मोठं शहर!  20 वर्षांच्या तरुणाने घरातून उभा केला 2 कोटींचा व्यवसाय

मुळात व्यवसाय उभा करायचं म्हटलं की मोठं शहर, भरपूर पैसा आणि मोठं ऑफिस असायला हवं असं आपल्याला वाटतं. पण बिहारमधल्या या तरूणाने असं काही केलंय की ज्यामुळे आज तो घरबसल्या 2 कोटींची कमाई करतो आहे. नवादा जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या अम्मार महमूद यांनी चक्क घरातून ऑनलाईन व्यवसाय सुरू केला आणि काही वर्षांतच त्याची उलाढाल कोटींच्या वर नेली.

अम्मार याला लहानपणापासूनच व्यवसायाची आवड होती. त्याचे वडील व्यवसाय करत असल्यामुळे लहानपणीच त्याला माल पुरवठ्यादारांपासून ग्राहकांपर्यंतचा संपूर्ण व्यवहार जवळून पाहिला आहे. त्यामळे व्यवसाय कसा चालतो, ग्राहकांशी कसं बोलायचं आणि मालाची विक्री कशी करायची, याचा अंदाज होता.

पुढे इंटरनेटवर ऑनलाईन विक्रिविषयी माहिती घेताना त्याला या क्षेत्राची आवड निर्माण झाली. बीबीएचे शिक्षण घेत असतानाच त्याने वडिलांच्या व्यवसायातही मदत सुरू ठेवली.2019 मध्ये त्यांनी स्वत:चा प्रोजेक्ट सुरू करून फ्लिपकार्टवर उत्पादनांची विक्री करण्यास सुरूवात केली. त्यानंतर 2022 मध्ये वयाच्या अवघ्या 20 वर्षी त्यांनी Aykitzil Inc या कंपनीची सुरूवात केली.

सुरूवातीला त्यांने टॉर्च आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रिवर लक्ष केंद्रित केलं. मात्र व्यवसाय वाढवताना पॅकेजिंग, मालाची वाहतूक आणि ग्राहकांपर्यंत वस्तू पोहोचवण्यात अनेक अडचणी आल्या. या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी वॉलमार्ट वृद्धी कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा घेतला. योग्य उत्पादन निवडणं, वस्तूंची गुणवत्ता सुधारणं आणि ग्राहकांचा विश्वास जिकणं यावर भर दिला.

याचा परिणाम त्यांच्या व्यवसासायाच्या आकडेवारीतही दिसून आला. 2022 मध्ये त्यांची विक्री साधारण 6 ते 8 लाख रूपये होती. 2023 मध्ये हा आकडा 75 लाख रूपयांवर पोहोचला. तर 2024 मध्ये त्यांच्या व्यवसायाची उलाढाल 2 कोटी रूपयांच्या घरात पोहोचली. आज अम्मार नवादा येथील आपल्या घरातूनच निव्वळ पाच जणांच्या टीमसोबच आपला हा व्यवसाय सांभाळतात. त्यांच्या उत्पादनांची विक्री देशभरात केली जाते.

 

 

Source: TV9 Marathi Business

Read full article on TV9 Marathi Business

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language