Hashtagintro

Nana Patekar : जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात, वडिलांचं निधन अन्…नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील मन हेलावणारा प्रसंग

Nana Patekar : जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात, वडिलांचं निधन अन्…नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील मन हेलावणारा प्रसंग

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’, ‘तिरंगा’, ‘अपहरण’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. अगदी वयाच्या १३व्या वर्षापासून नानांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग तर मन हेलावून टाकणारा आहे. वडिलांचा मृतदेह समोर असतानाही नानांना नाटकाचा प्रयोग करावा लागला होता.

वडिलांच्या व्यवसायात जवळच्याच व्यक्तीने केला विश्वासघात

नाना पाटेकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला. त्यांचे वडील कापड रंगवण्याचा छोटासा व्यवसाय करायचे. मात्र, एका जवळच्या व्यक्तीनं त्यांची फसवणूक केली. या विश्वासघातामुळे त्यांच्या वडिलांचे मोठं आर्थिक नुकसान झालं. इतकंच नाही तर त्यांची संपत्ती आणि पैसेही हिरावून घेण्यात आले. या धक्क्यामुळे नानांच्या वडिलांची मानसिक आणि शारीरिक प्रकृती खालावली. त्यावेळी नाना अवघे 13 वर्षांचे होते.

वयाच्या 13व्या वर्षापासून सुरू केला संघर्ष

घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे नानांनी लहान वयातच काम करण्यास सुरुवात केली. चित्रपटांचं पोस्टर रंगवण्याचं काम करून ते महिन्याला 35 रुपये कमवायचे. चुनाभट्टी परिसरात जाऊन पोस्टर रंगवण्यासोबतच त्यांनी रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग रंगवण्याचं कामही केलं. कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी त्यांना बालपणापासूनच कष्ट करावे लागले.

नाना पाटेकर यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी प्रसंग म्हणजे त्यांच्या वडिलांचं निधन. त्यावेळी नाना 28 वर्षांचे होते. वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ते ‘महासागर’ या नाटकाच्या प्रयोगात व्यग्र होते. घरात वडिलांचा मृतदेह होता आणि दुसरीकडे नाटकाचा प्रयोग सुरू होता. वडिलांच्या निधनानंतर नाटकाचा प्रयोग रद्द करावा का, याबद्दल चर्चा झाली. मात्र, नानांनी प्रयोग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. स्वतः दुःखात असताना आपल्यामुळे इतर कलाकार आणि प्रेक्षकांना त्रास होऊ नये, अशी त्यांची भावना होती. त्यामुळे वडिलांच्या निधनाचं दुःख मनात ठेवून त्यांनी रंगमंचावर आपली जबाबदारी पार पाडली.

10 वर्षांच्या संघर्षानंतर मिळाली खरी ओळख

नाना पाटेकर यांनी 1978 मध्ये ‘गमन’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, सुरुवातीला त्यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. जवळपास दहा वर्षांच्या संघर्षानंतर 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सलाम बॉम्बे!’ या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली. त्यानंतर ‘परिंदा’ चित्रपटातील भूमिकेनं त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language