सोने आणि चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू खरेदी करण्याकडे सर्वसामान्यांचा जास्त कल असतो. एक योग्य गुंतवणूक म्हणून अनेकजण सोने खरेदी करतात. पण सोने आणि चांदीचे दर गेला संपूर्ण वर्ष आकाशाला स्पर्श करताना दिसत होते. पण आता चार-पाच दिवसांपासून हे दर घसरले आहेत.
आज जळगावच्या सराफ बाजारात मोठे बदल झाले आहेत. सोने आणि चांदीच्या घरात पुन्हा घसरण झाली आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस हा चांगला आहे.
जळगावच्या जराफ बाजारात आज, 21 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 1 हजार 500 रूपयांची घसरण झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 1 हजारांची घसरण झाली आहे.
आज 21 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 27 हजार 205 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव हा जीएसटीसह 1 लाख 58 हजार 620 रुपये आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Source: TV9 Marathi Business





