
अनेकदा आपण डोगराळ भागात सुट्टी घालवून आलो की तिकडच्या गोष्टी मिस करतो. डोंगर दऱ्या म्हणजे मॅग्गी आणि चहा! पण एकदा का ट्रिपवरून परत आलो की तिकडचा चहा प्यावासा वाटतो. मग अशावेळी काय करावं सुचत नाही. टेन्शन नको! आम्ही तुमच्यासाठी खास पहाडो वाली चहाची झटपट होणारी रेसिपी घेऊन आलो आहोत. हि रेसिपी फूड कंटेंट क्रिएटर आणि होम शेफ श्रुती महाजन हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. श्रुतीने तिने हा चहा पहिल्यांदा उत्तरकाशीमध्ये चाखून पाहिला होता असेही सांगितले आहे. चला बघुयात हा चहा नेमका कसा बनवायचा.
लागणारे साहित्य
खाली दिलेल्या साहित्यामध्ये साधारण तीन लोकांसाठी हा चहा तयार होतो.
१½ कप पाणी
एक इंच आल्याचा तुकडा
५ ते ६ तुळशीची पाने
१२ ते १५ पुदिन्याची पाने
३ ते ४ लवंगा
२ ते २ वेलदोडे (वेलची)
२ ते ३ चमचे चहापत्ती
दूध (आवश्यकतेनुसार)
गूळ (चवीनुसार)
कसा बनवायचा हा पाहाडो वाला चहा?
सगळ्यात आधी अद्रक, तुळशीची पाने, पुदिना, लवंग आणि वेलची यांना छान ठेचून घ्या. याची पूड न करता फक्त जाडसर छान कुटून घेयचं आहे.
आता एका चहाच्या पातेल्यात दीड कप पाणी घालून त्यात आपण ठेचून बनवलेला मसाला टाका.
आता या पाण्याला छान ५ मिनिटे मंद आचेवर उकळू द्या. यामुळे ते मसाले पाण्यात छान मिळसून जातील आणि स्वाद सोडतील.
यानंतर या पाण्यात चहा पावडर घाला आणि २ मिनिटे छान उकळून घ्या.
दोन मिनिटानंतर त्यात दूध घालून पुन्हा एकदा दोन मिनिटे छान उकळून घ्या.
चहा चांगला उकळला की, त्यात चवीनुसार गूळ घाला. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर गॅस बंद करा.
अशा प्रकारे, तुमचा चविष्ट, पाहाडो वाली चाय पिण्यासाठी तयार आहे.
Source: TV9 Marathi Lifestyle
