Hashtagintro

ना एकदा, ना दोनदा… रणवीर सिंहला रझा मुराद यांनी मारल्या तब्बल 24 कानाखाली! ‘पद्मावत’च्या सेटवर नेमकं काय घडलं?

ना एकदा, ना दोनदा… रणवीर सिंहला रझा मुराद यांनी मारल्या तब्बल 24 कानाखाली!  ‘पद्मावत’च्या सेटवर नेमकं काय घडलं?

चित्रपटात एखादा सीन परफेक्ट व्हावा म्हणून कलाकार खूप मेहनत घेतात हे आपल्याला माहित आहेच. पण दिग्दर्शकाला हवा तसा शॉट मिळेपर्यंत तब्बल 24 वेळा कानाखाली खावी लागली तर? ऐकूनच, राहूदेत नको हा सीन शूट करायला.. असचं वाटेल आपल्याला… पण रणवीर सिंगने असा काही सीन दिला की कानाखाली मारणाराही दमून गेला.

नेमकं सेटवर काय झालं

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पद्मावत’ चित्रपटात रणवीर सिंहने अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारली होती. तर रझा मुराद यांनी जलालुद्दीन खिलजी ही भूमिका साकारली होती. चित्रपटातील एका प्रसंगात रझा मुराद यांना रणवीर साकारत असलेल्या अलाउद्दीन खिल्जीला थप्पड मारायची होती. हा सीन एकाच शॉटमध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना या पहिला शॉट पसंत पडला नाही.

त्यामुळे पुन्हा शॉट घेण्यात आला. पण त्यानंतरही भन्साळी यांचं समाधान झालं नाही. सीन हवा तसा दिसत नसल्याने वारंवार रिटेक घ्यावे लागले. अशा प्रकारे रझा मुराद यांनी रणवीरला 1- 2 नव्हे, तर तब्बल 24 वेळा थप्पड मारली. अखेर 24 व्या टेकनंतर भन्साळी यांनी सीन ओके म्हटले.

 

रणवीरचा गाल लाल झाला आणि सुजला

या सलग थप्पडांमुळे रणवीर सिंहचा गाल लाल झाला होता आणि सुजल्यासारखी अवस्था झाली होती. यासोबतच त्यांनी असे टँलेटेड कलाकार फार कमी आहेत असं म्हणून कौतुकही केलं. सीन पूर्ण करण्यासाठी रणवीरने मेहनत घेतली. याआधीही ‘बेफिक्रे’ चित्रपटातील एका सीनसाठी 21 वेळा थप्पड खाव्या लागल्या होत्या.

रझा मुराद यांनी सांगितला किस्सा

नुकत्याच ‘द लल्लनटॉप’ ला दिलेल्या मुलाखतीत रझा मुराद यांनी त्यांच्या कारकिर्दितील अनेक आठवणी सांगितल्या. त्यावेळी त्यांना प्रोमोमध्ये मधील रणवीरला थप्पड मारण्याच्या प्रसंगाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी 24 वेळा थप्पड मारावी लागली असं सांगितलं. या शूटिंगदरम्यान रणवीरचा गाल सुजला होता. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान पद्मावतमध्ये दिपिका पदुकोणने राणी पद्मावती, तर शाहिद कपूरने महारावला रतन सिंह यांची भूमिका साकारली होती. रणवीरच्या अलाउद्दीन खिल्जीच्या भूमिकचंही प्रचंड कौतुक झालं होतं. आता रझा मुराद यांनी सांगितलेल्या या जुन्या किस्स्यामुळे चित्रपटाच्याच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना घ्यावी लागणारी मेहनत पुन्हा चर्चेत आली आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language