
एक आईचं दुसऱ्या आईची अडचणं अगदी चांगल्या प्रकारे समजू शकते. अशीच काहीशी या ब्रँड मागची स्टोरी आहे. तामिळनाडूतील दिपीका त्यागराजन आणि त्यांचे पती त्यागराजन यांनी अवघ्या 60 हजार रूपयांत स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि काही वर्षांतच तो कोट्यावधींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे या व्यवसायाची कल्पना दीपिका यांना त्यांच्या प्रेग्नेसीदरम्यान सुचली. स्वत:साठी आरामदायी आणि स्टायलिश कपडे शोधताना त्यांना गरोदर महिलांसाठी असलेली कन्फर्टेबल कपड्यांची कमतरता जाणवली आणि तिथूनच पुची ( putchi ) या मॅटर्निटी ब्रँडचा जन्म झाला.
स्वत:ची अडचण बनली व्यावसायाची आयडिया
सुरूवातील दिपीका आणि त्यांचे पती ऑस्ट्रेलियात राहत होते. त्यागराजन हे रिअल इस्टेट क्षेत्रात नोकरी करत होते. दीपीका प्रेग्नेंट असताना त्यांना आरामदायी , आकर्षक आणि स्तनपानासाठी सोयीस्कर कपडे शोधण्यात अडचणी येत होत्या. बाजारात नवाशिशूसाठी अनेक कपडे होते. पण नव्या आईसाठी किंवा होणाऱ्या आईला आरामदायी वाटेल अशा कपड्यांची कमतरता होती. हीच कमतरता दीपीका यांच्या लक्षात आली.
2020 मध्ये ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यानंतर या जोडप्याने कोयंबतूरमध्ये अवघ्या 60 हजारांच्या गुंतवणूकीतून व्यवसाय सुरू केला. त्यांच्या मुलाला त्या प्रेमाने putchi असं म्हणायच्या आणि त्याच्याच जन्मावेळी त्यांना ही कल्पनाही आली त्यामुळे त्यांनी या ब्रँडचे नाव ‘putchi’ असे ठेवले.
सुरूवातीला स्वत:चं डिझाईन केले 10 ड्रेस
व्यवसायाच्या सुरूवातीला दीपिका यांनी स्वत: 10 फिडिंग ड्रेस डिझाईन केले. मार्च 2020 मध्ये ऑनलाईन विक्री सुरू केली. ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला आणि स्वत:ची वेबसाईट सुरू केली.
5 कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचला व्यवसाय
सुरूवातील मॅटर्निटी आणि फिडिंग ड्रेस विकणाऱ्या या ब्रँडने पुढे आपल्या उत्पादनांची संख्या वाढवली. आता त्यांचा ब्रँड फिडिंग कुर्ते, नर्सिंग ब्रा, मॅटर्निटी कपडे, बाळांसाठी आवश्यक वस्तू, खेळणी, पुस्तके, पीरीयड केअर उत्पादने आणि आई – बाळांसाठी मॅचिंग कपडे असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
याशिवाय 275 वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांच्या हाताला रोजगार दिला आहे.
95% ऑनलाईन विक्री
या ब्रँडची सुरूवात छोट्या भांडवलातून झाली आणि 3 वर्षात त्याची उलाढाल 5 कोटीं रूपयांवर पोहोचली. सध्या या ब्रँडच्या 900 हून अधिक डिझाईन्स उपलब्ध आहेत. कंपनीच्या एकूण विक्रिपैकी 95% विक्री ही ऑनलाईन होते. भारताबरोबरचं अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही हा ब्रँड गेला आहे.
Source: TV9 Marathi Business
