Hashtagintro

Video : 8 महिन्यांची गर्भवती असतानाही धावली मॅरेथॉन! महिलेची थक्क करणारी गोष्ट

Video : 8 महिन्यांची गर्भवती असतानाही धावली मॅरेथॉन! महिलेची थक्क करणारी गोष्ट

जगातील सर्वात महान आणि मोठी शक्ती म्हणजे मातृत्व. आई कशीही असली कुठल्याही परिस्थितीत असली तरी होणारं, तिच्या गर्भात वाढणारं बाळ तिला खूप बळ देतं. अशाच एका आईची थक्क करणारी गोष्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. कारण ही आई तिच्या प्रेग्नेंसी दरम्यान कशाचीही पर्वा न करता मोठं पोटं घेऊन चक्क 7 मॅरेथॉन धावली आहे. वाटलं ना आश्चर्य?

विशेष म्हणजे 34 आठवड्यांची गर्भवती असताना तिने न्यूयॉर्क मॅरेथानमध्येही सहभाग घेतला आणि अवघ्या चार तासांपेक्षा थोड्या अधिक वेळात शर्यत पूर्ण केली. डिअर्ड्रे कीन असं या 38 वर्षीय महिलेचं नाव आहे. तिच्या या कामगिरीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

डिअर्ड्रे कीन या न्यूयॉर्कमध्ये राहतात. त्या नर्स प्रॅक्टिशनर आणि मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करते. तिला याआधीही 60 हून अधिक मॅरेथॉनचा अनुभव होता. 2026 मध्ये त्यांनी जगातील 7 हून अधिक मॅरेथॉनचा अनुभव होता. काही दिवसांनंतर तिला बोस्टन आणि लंडन मॅरेथॉन दरम्यान त्यांचा धावण्याचा वेग कमी झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रेग्नेंसी टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली. पण तिने मॅरेथॉन काहीही पूर्ण करायचे असे ठरवले होते.

धावण्याचा वेग कमी ठेवणे, गरज पडल्यास चालणे, पुरेसं पाणी पिणं योग्य आहार घेणं याकडे लक्ष दिलं. त्यानंतर तिने 25 आठवड्यांची गर्भवती असताना न्यूयॉर्क मॅरेथॉन 4 तास 6 मिनिटे 55 सेकंदात पूर्ण केली. हळूहळू त्यांनी 8 महिन्यापर्यंत ठरवलेल्या 7 ही मॅरेथॉन पूर्ण केल्या. या सगळ्या मॅरेथॉन दरम्यान तिची जिद्द तर होतीच पण तिला तिच्या पतीचीही मोठी साथ होती. याशिवाय मित्रमंडळी देखील त्यांना प्रोत्साहित करत होते.

वडिलांकडून मिळाली धावण्याची प्रेरणा

डिअर्ड्रे यांच्या या धावण्यामागे त्यांच्या वडिलांची प्रेरणा होती. त्यांचे वडील जॉन यांनाही धावण्याची आवड होती. त्यांना ब्रेन ट्युमर असतानाही त्यांनी धावणं सुरू ठेवलं होतं. ट्युमर काढण्याच्या शस्त्रक्रियेच्या आधी त्यांनी न्यूयॉर्क मॅरेथॉन पूर्ण केली होती. आता आपल्या मुलालाही आयुष्यातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरं जाण्याची शिकवण द्यायची आहे. असं डिअर्ड्रे हिने सांगितले.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language