सलग तीन ते चार दिवसाच्या मोठ्या घसरणीनंतर आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे पुन्हा सर्वसामान्यांचा हिरमोड होणार आहे. चला जाणून घेऊया आजचा 10 ग्रॅम सोन्याचा आणि एक किलो चांदीचा भाव…
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज बदल झाले आहेत. सोन्याच्या दरांनी उसळी घेतली आहे. तर चांदीचे दर हे स्थिर असल्याचे चित्र आहे.
आज, 23 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या भावात 2 हजार 300 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 29 हजार 574 रुपयांवर पोहोचले आहेत.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत. चांदीचे दर हे स्थिर असल्यामुळे एक किलो चांदीसाठी जीएसटीसह 1 लाख 58 हजार 620 रुपये मोजावे लागणार आहेत.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Source: TV9 Marathi Business





