Hashtagintro

Mumbai Crime News : CSR निधी घोटाळ्याप्रकरणी जुहूतील धर्मेंद्र सिंगला ईडीकडून अटक; 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप

मुंबई : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जुहू येथील रहिवासी धर्मेंद्र सिंग याला अटक केली आहे. सिंगने जवळपास तीन दशके डॉक्टर असल्याचे भासवून विविध ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य आणि धर्मादाय प्रकल्पांसाठी निधी उभारल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सुमारे 200 कोटी रुपयांचा निधी वळवून त्याचे मनी लाँड्रिंग केल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

विशेष पीएमएलए न्यायालयात हजर
ईडीच्या विनंतीवरून न्यायालयाने जारी केलेल्या प्रोडक्शन वॉरंटनुसार धर्मेंद्र सिंग याला सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली त्याला औपचारिकपणे अटक करण्याची परवानगी मागितली.
https://www.prahaar.in/2026/11/23/pm-modi-announces-24000-crore-nepali-rupees-development-package-for-nepals-flood-reconstruction2026/
ईडीचे सरकारी वकील अरविंद आगाव यांनी न्यायालयात सांगितले की, सिंगकडे वैद्यकीय पात्रता किंवा व्यावसायिक अनुभव नसतानाही त्याने डॉक्टर असल्याचे भासवले. विविध ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्यसेवा आणि धर्मादाय कामांशी संबंधित व्यक्ती म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला.
सिंगच्या वकिलांनी अटकेच्या मागणीला विरोध केला. ईडीने यापूर्वीच त्याचा जबाब नोंदवला असल्याने पुढील कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. मात्र, सीएसआर निधीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रथमदर्शनी संशय असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

40 कंपन्यांचा सीएसआर निधी वळवल्याचा आरोप
ईडीच्या तपासानुसार, धर्मेंद्र सिंगने विविध धर्मादाय ट्रस्ट स्थापन करून आरोग्यविषयक प्रकल्पांसाठी सीएसआर निधी मिळवला होता. जवळपास 40 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी कंपन्यांकडून हा निधी मिळाल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.
मात्र, निधीच्या तुलनेत अनेक प्रकल्प केवळ अंशतः पूर्ण करण्यात आले किंवा काही प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णच झाले नाहीत, असा ईडीचा आरोप आहे. तसेच विक्रेत्यांची बिले वाढवून दाखवणे आणि अतिरिक्त निधी बनावट कंपन्या किंवा शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवणे असे प्रकार झाल्याचा संशय आहे.
सीएसआर निधी मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या मध्यस्थांना कमिशन दिल्याचाही आरोप ईडीने केला आहे. या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू असून, निधीचा नेमका वापर कुठे झाला आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language