Hashtagintro

लग्नात इंटरेस्ट नाही, मुलं पैदा करायची नाही, या देशातील तरुण-तरुणींच्या इच्छाच मेल्या?

लग्नात इंटरेस्ट नाही, मुलं पैदा करायची नाही, या देशातील तरुण-तरुणींच्या इच्छाच मेल्या?

गेल्या काही वर्षापासून जगावर दक्षिण कोरियाच्या सिनेमांपासून लाइफस्टाईलने गारूड निर्माण केलं आहे. भारतातही कोरियन कंटेटसह कोरिअन मेन्यूही उपलब्ध आहे. भारतीयांवरही कोरियन सिनेमा आणि लाइफस्टाईलची छाप पडलेली आहे. त्यामुळे अनेकांना कोरियात जाऊन शिकावं वाटतंय, राहावं वाटतंय आणि कोरियात जाऊन सेटल व्हावसं वाटतंय. पण कोरियातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अनेक कोरियन तरुण आणि तरुणींना लग्न करायचं नाहीये आणि वंशही वाढवायचा नाहीये. कोरियन तरुण-तरुणींच्या लग्नाबाबतच्या इच्छा मेल्यात का? अशी चर्चा रंगली आहे. तर, दुसरीकडे कोरियन सरकारची चिंता वाढली आहे.

जनगणना 2025च्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 30 वयोगटातील सर्वाधिक तरुण अविवाहित राहिले आहेत. योनहाप न्यूज एजन्सीच्या मते, दक्षिण कोरियात 30 ते 39 वयोगटातील अर्ध्याहून अधिक लोक अविवाहित आहेत. जनगणना 2025च्या आकडेवारीनुसार या वयोगटातील 53.1 टक्के लोकांनी अविवाहित असल्याचं सांगितलं. पाच वर्षात म्हणजे 2020मध्ये हा आकडा 42.5 टक्के होता. वर्ष 2000 मध्ये या वयाचे केवळ 13.4 टक्के लोक अविवाहित होते. म्हणजे गेल्या 25 मध्ये हे चित्र पूर्ण बदलून गेलं आहे.

तरुण नव्हे तरुणीही लग्नाला तयार नाही

केवळ पुरुषच नाही तर तरुणीही लग्नाला तयार नसल्याचं दिसून आलं आहे. 30 ते 39 वयोगटातील 61.1 टक्के पुरुष अविवाहित आहेत. तर महिलांची ही सरासरी 44.3 टक्के आहे. यावरून दक्षिण कोरियातील लोक लग्नाला उत्सुक नसल्याचं दिसून येत आहे. वयाची तिशी गाठली तरी लग्न करताना दिसत नाहीये. याचा अर्थ या तरुण तरुणींनी लग्नाचा विचार सोडून दिलाय असं नाहीये. यातील बऱ्याच अविवाहितांना भविष्यात लग्न करायचं आहे. 19 वर्षाहून अधिक वयाच्या अविवाहितांमध्ये 57.8 टक्क्यांनी लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे. पुरुषांमध्ये हा आकडा 60.4 टक्के आणि महिलांमध्ये 54.4 टक्के आहे.

मुलं जन्माला घालायची नाही

19 ते 49 वयोगटातील केवळ 35.4 टक्के लोकांनी मुलं जन्माला घालण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यात पुरुषांची टक्केवारी 39.8 आहे. तर महिलांची टक्केवारी 30.9 एवढी आहे. म्हणजे लग्नाबरोबरच मुलं जन्माला घालण्यासही कोरियन मुलं आणि मुली इच्छुक नसल्याचं दिसून येत आहे. 15 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या 4.45 कोटी लोकांमध्ये 54.7 टक्के विवाहित आहे. तर 31/3 टक्के लोकांना जीवनसाथीच नाहीये.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language