Hashtagintro

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मूड बदलला; भारताला सर्वात मोठा झटका, अमेरिकेनं आता थेट…

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मूड बदलला; भारताला सर्वात मोठा झटका, अमेरिकेनं आता थेट…

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा टॉरिफ वॉर सुरू करणार आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार अमेरिका आता भारत-चीन, युरोपीयन यूनियन तसेच जपानसह 14 देशांमधून येणाऱ्या सामानांवर टॅरिफ वाढवण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिका ज्या देशांवर आता टॅरिफ लावणार आहे, ते सर्व देश आपल्या कंपन्यांना सबसिडी देऊन फायदा पोहोचवत असल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे. यामुळे अमेरिकन कंपन्यांना प्रचंड नुकसान होत असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अमेरिकेचे ट्रेड रिप्रेजेंटिव्ह जेमीसन ग्रीर हे लवकरच या संदर्भातील रिपोर्ट सादर करण्याची शक्यता आहे. दरम्यान जर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर टॅरिफ वाढवला तर हा भारतासाठी मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.

या रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार आता अमेरिकेकडून ज्या देशांवर सबसिडी लावण्याची तयारी सुरू आहे, त्या देशांना तेथील सरकार देत असलेल्या सबसिडीवर अमेरिकन सरकारचा अभ्यास सुरू आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा अभ्यास सुरू असून आता हा अभ्यास अंतिम टप्प्यात आला आहे. याच अभ्यासाच्या आधारे येणार्‍या काळात भारतासह युरोपियन युनियनचे 27 देश, जपान आणि चीनवर अमेरिकेकडून प्रचंड टॅरिफ लावला जाणार आहे. आता लवकरच नव्या टॅरिफची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोणावर किती टॅरिफ लावला जाणार?

वॉल स्ट्रि जर्नलच्या एका रिपोर्टनुसार युरोपीयन युनियनचे 27 देश तसेच जपान आणि दक्षिण कोरियाकडून अमेरिकेत येणाऱ्या सामानांवर 15 टक्के टॅरिफ लावला जाण्याची शक्यता आहे. तर भारतावर 15 टक्क्यांपेक्षा कितीतरी अधिक टॅरिफ अमेरिका लावणार असल्याची माहिती समोर येत आहे. चीन आणि अमेरिकेवर देखील मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला जाण्याची शक्यता आहे. ज्या देशांवर अमेरिकेकडून टॅरिफ लावला जाणार आहे, ते सर्व देश आपल्या कंपन्यांना अधिकाधिक सबसिडी देऊन दुसऱ्या देशांमध्ये स्वस्त सामान विकण्यासाठी प्रोहत्साहीत करत आहेत, त्यामुळे अमेरिकेचं मोठं नुकसान होत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

 

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language