Hashtagintro

IPL 2027: पारस म्हाम्ब्रे पंजाब किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक होणार! मिनी लिलावापूर्वी घडामोडींना वेग

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पंजाब किंग्स फ्रेंचायझी सुरूवातीपासून खेळत आहे. मात्र मागच्या 19 पर्वात पंजाब किंग्सच्या पदरी निराशा पडली आहे. पंजाब किंग्सने दोन वेळा अंतिम फेरी गाठली, पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली. 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात अंतिम फेरी गाठली होती. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर मागच्या पर्वात सुरूवातीच्या सामन्यात पंजाब किंग्सने विजयाची लय पकडली. मात्र त्यानंतर विजयाची गाडी घसरली आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नाही. आता कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्स तिसऱ्यांदा सज्ज झाला आहे. तर ट्रेड विंडोच्या माध्यमातून हार्दिक पांड्या संघात आल्याने बळ वाढलं आहे. असं असताना पंजाब किंग्स आता कोचिंग स्टाफमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. पारस म्हाम्ब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची तयारी सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात राजीनामा दिलेल्या जेम्स होप्स यांच्या जागी म्हाम्ब्रे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. राजीव कुमार यांची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणूनही नियुक्ती करण्यात येईल. ते माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ब्रॅड हॅडिन यांची जागा घेतील. राजीव हे चेन्नई सुपर किंग्सच्या प्रशिक्षण संघाचा भाग होते.
पारस म्हाम्ब्रेचा अनुभव
पारस म्हाम्ब्रे यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मोठा अनुभव आहे. त्यांनी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. म्हाम्ब्रे 2021 ते 2024 पर्यंत राहुल द्रविडच्या प्रशिक्षण संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी इंडिया ‘ए’ आणि इंडिया अंडर-19 संघांचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी बंगाल, महाराष्ट्र, बडोदा आणि विदर्भ संघांना प्रशिक्षण दिले आहे.पारस म्हाम्ब्रे आयपीएलमध्ये बऱ्याच काळापासून मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहेत. तो आयपीएलच्या पहिल्या हंगामात (2008) सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून एमआयमध्ये सामील झाला. फ्रँचायझीने 2010 मध्ये त्याची सहायक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. त्याने 2017 मध्ये संघ सोडला आणि त्यानंतर 2024 ते 2026 या कालावधीसाठी एमआयचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून परतला.

https://www.prahaar.in/2026/11/24/vaibhav-sooryavanshi-shared-his-thoughts-following-his-explosive-double-century-innings-against-the-uae/

पारस म्हाम्ब्रेचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून असलेला व्यापक अनुभव पंजाब किंग्ससाठी फायदेशीर ठरू शकतो, जो आपल्या पहिल्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात आहे. पंजाबची गोलंदाजी मजबूत करण्यासाठी म्हाम्ब्रेला मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासोबत मिळून काम करावे लागेल. पंजाब किंग्जमध्ये पारस म्हांब्रे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासोबत काम करतील. यापूर्वी त्यांनी मुंबई इंडियन्समध्ये रिकी पाँटिंग यांच्यासोबत काम केले आहे. याशिवाय, हार्दिक पांड्याच्या ट्रेडनंतर मुंबई इंडियन्समधून पंजाब किंग्जमध्ये सामील होणारे ते दुसरे मोठे नाव असेल.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language