Hashtagintro

Ratnagiri News : चिपळूणचे ग्रामदैवत जुना कालभैरव जयंती उत्सवास आजपासून प्रारंभ

चिपळूण : शहराचे सुप्रसिद्ध, जागृत श्रद्धास्थान ग्रामदैवत श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत श्री कालभैरव जयंती महोत्सवाचे आयोजन श्री ग्रामदेव जुना कालभैरव मंदिरात करण्यात आले आहे.यात २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी सनई चौघडा वादन, श्रींची नित्यनियमित पूजा-अर्चा, सायंकाळी ७.३० वाजता कर्पूर आरती, नंतर श्री कालभैरव ध्यानं, स्तोत्र, अष्टक, कवच पठण इत्यादी धार्मिक विधी होतील.

२५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री विश्वकर्मा प्रासादिक महिला संगीत भजन, २६ रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री जिव्हेश्वर प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पेठमाप), २७ रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री कालिका माता प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (पेठमाप), २८ जी सायंकाळी ५ ते ७ तालसाधना प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ (खेर्डी ), २९ रोजी सायंकाळी ५ ते ७ कै. वामनराव साडविलकर संस्थापीत स्वरदर्शन कलाकुंज चिपळूण प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली अंतर्गत ‘स्वरबाल्य’ (उदयोन्मुख बालकलाकरांचा सहभाग), ३० रोजी सायंकाळी ५ ते ७ श्री स्वर साधना प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( कान्हे-पिंपळी) असे कार्यक्रम होणार आहेत.

तसेच १ डिसेंबर रोजी श्री कालभैरव जयंती (कालाष्टमी) पहाटे ६ ते ७ आणि सकाळी १० ते १०.३० पर्यंत स्वरसुगंध शहनाई ग्रुप (सातारा) प्रस्तुत सनई-चौघडा वादन (प्रत्यक्ष सादरीकरण) अभिजीत जाधव आणि सहकारी (सातारा), सकाळी १०.३० ते दुपारी १ श्री कालभैरव प्रकट दिन कीर्तन कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेशबुवा जोशी धानोरकर (पुणे) दुपारी १ ते ४ वाजता श्री गांधारेश्वर भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक, संध्याकाळी ५ ते ७ वा. कै. वामनराव साडविलकर संस्थापित स्वरदर्शन कलाकुंज चिपळूण प्रस्तुत संगीत स्वरसुमनांजली अंतर्गत पद्मश्री श्रीनिवास खळे यांच्या जनशताब्दीनिमित्त त्यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक गाण्यांचा कार्यक्रम, रात्री ९ ते ११ वा. श्री हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ (ओझरवाडी), चिपळूण यांचा कार्यक्रम, २ डिसेंबर रोजी लळीत कार्यक्रम, सकाळी ११ ते दुपारी २ महाप्रसादम, सायंकाळी ५ ते ७ श्री श्रीराम प्रासादिक महिला संगीत भजन मंडळ ( वैश्यवसाहत ) चिपळूण यांचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते ७.३० वा. श्री वेस मारुती भेटीसाठी श्रींची सवाद्य पालखी मिरवणूक, रात्री ९ ते १२.३० पर्यंत लळीताचे कीर्तन, कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेशबुवा जोशी धानोरकर (पुणे) आदी कार्यक्रम होतील. तरी नागरिकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ग्रामदेव जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टतर्फे करण्‍यात आले आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language