Hashtagintro

Ravindra Mahajani : भाड्याच्या घरात आढळलेला मराठी अभिनेत्याचा मृतदेह, तीन दिवस कुणालाही नव्हता थांगपत्ता; काय घडलेलं?

Ravindra Mahajani : भाड्याच्या घरात आढळलेला मराठी अभिनेत्याचा मृतदेह, तीन दिवस कुणालाही नव्हता थांगपत्ता; काय घडलेलं?

मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे आणि लोकप्रिय अभिनेते म्हणून रवींद्र महाजनी यांची विशेष ओळख होती. आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने, भारदस्त आवाजानं आणि दमदार अभिनयानं त्यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पावलं’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली. मात्र, या लोकप्रिय अभिनेत्याचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला.

जुलै 2023 मध्ये पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील एका भाड्याच्या घरात रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळला होता. विशेष म्हणजे, त्यांच्या निधनाची माहिती तीन दिवसांनंतर समोर आली. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यानं या घटनेनं संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वाला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी रवींद्र महाजनी पत्नी आणि मुलगा गश्मीर यांच्यासोबत न राहता एकटेच का राहत होते, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

‘त्यांनी स्वतःच वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता’

रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर मुलगा गश्मीर महाजनी याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. वडिलांना एकटं का ठेवलं? त्यांची काळजी का घेतली नाही? असे अनेक प्रश्न त्याला विचारले जात होते. यानंतर गश्मीरने सौमित्र पोटेच्या ‘मित्र म्हणे‘ला दिलेल्या मुलाखतीत या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली होती. गश्मीरनं सांगितलं की, वडिलांनी स्वतःहून कुटुंबापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. जवळपास २० वर्षांपासून ते स्वतंत्र राहत होते. त्यांना स्वतःच्या मर्जीनुसार आणि स्वातंत्र्यानं आयुष्य जगायला आवडायचं. त्यांना जेव्हा कुटुंबासोबत राहावंसं वाटायचं, तेव्हा ते घरी यायचे आणि काही दिवस राहून पुन्हा निघून जायचे.

गश्मीरने पुढे सांगितलं की, त्याचे वडील स्वभावाने खूप मूडी होते. त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला आवडायची. अगदी स्वयंपाक करणं, घराची देखभाल करणं यांसारखी कामंही ते स्वतःच करायचे. कुटुंबीयांनी त्यांच्या मदतीसाठी केअरटेकरची व्यवस्था केली होती. मात्र, रवींद्र महाजनी यांना दुसऱ्यांनी आपली कामं केलेली आवडत नसे. त्यामुळे ते केअरटेकरला एक-दोन दिवसांतच कामावरून काढून टाकायचे. वडिलांनी कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या व्यक्तींशी संपर्क कमी केला होता. शेजाऱ्यांशीही त्यांचा फारसा संवाद नसायचा. त्यामुळे त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबीयांना उशिरा मिळाली.

वडिलांसोबतच्या नात्याबद्दल बोलताना गश्मीरने सांगितलं की, त्यांच्या नात्यात अनेक कारणांमुळे दुरावा निर्माण झाला होता. मात्र, कुटुंबातील काही वैयक्तिक गोष्टी सार्वजनिकपणे सांगणं योग्य नाही, असं त्याचं मत होतं. वडील परिपूर्ण नव्हते, तसाच तो स्वतःही परिपूर्ण नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language