गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सतत घसरण होत असल्याचे चित्र आहे. पण आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी खळबळ पाहायला मिळाली. सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव किती?
आज जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बदल झाले आहेत. दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जर तुम्ही सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा…
26 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर एक किलो चांदीच्या दरात 3 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना सोने खरेदी करताना पुन्हा विचार करावा लागणार आहे.
सराफ बाजारातील वाढलेले दर पाहाता आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह 1 लाख 27 हजार 720 रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा दर जीएसटीसह 1 लाख 56 हजार 560 रुपयांवर पोहोचला आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)
Source: TV9 Marathi Business





