Hashtagintro

Ind Vs Nz: भारताचा दुसऱ्या कसोटीचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला, ध्रुव जुरेलची झुंजार खेळी

मुंबई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्चच्या हॅगले ओव्हल मैदानात सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. न्यूझीलंडने पहिल्या डावात 356 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव 246 धावांवर आटोपला. यासह पहिल्या डावात न्यूझीलंड 110 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात भारतीय 246 धावांपर्यंत मजल मारेल की नाही याबाबतही शंका होती. मात्र ध्रुव जुरेलच्या झुंजार खेळीमुळे ते शक्य झालं. त्यामुळे भारत 110 धावांनी पिछाडीवर असला तरी काही अंशी दिलासा मिळाला आहे. भारताने 117 धावांवर 7 विकेट गमावल्या होत्या, यावरून अंदाज येतो. ध्रुव जुरेलने 170 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या. त्याचं शतक हुकलं तरी भारताला संकटातून बाहेर काढण्यात त्याची खेळी महत्त्वाची ठरली .(TeamIndia)
भारताचा डाव
भारताचे आघाडीचे फलंदाज या सामन्यात सपशेल फेल गेले. यशस्वी जयस्वालला तर खातंही खोलता आलं नाही. केएल राहुल 25, देवदत्त पडिक्कल 21, कर्णधार शुभमन गिल 17, ऋषभ पंत 23, वॉशिंग्टन सुंदर 10 धावा करून बाद झाले. तर अंशुल कंबोजही खातं न खोलता तंबूत परतला. पण तळाच्या फलंदाजांनी थोडी फार ध्रुव जुरेलला साथ दिली. त्यामुळे त्याने हा डाव 246 धावांपर्यंत पुढे नेण्यात यश मिळवलं. आकाश दीप 29, गुरनूर ब्रार 10 धावा करून बाद झाले. तर जसप्रीत बुमराह नाबाद 4 धावांवर राहिला.(TestCricket)

न्यूझीलंडकडून काइल जेमिसन याने भारतीय संघाची दाणादाण उडवून दिली. त्याने 25.1 षटकात 69 धावा दिल्या आणि 4 विकेट काढल्या. तर मॅट हेनरी, नाथन स्मिथ आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी 2 विकेट काढल्या.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language