Hashtagintro

Mumbai Pune Expressway : प्रवाशांसाठी खुशखबर! अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच जोडले जाणार, 67 टक्के काम पूर्ण

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होण्याची शक्यता आहे. अटल सेतूला थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबईत 7.35 किलोमीटर लांबीचा सहापदरी उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत 67 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कळंबोली आणि पळस्पे फाटा परिसरातील वाहतूककोंडी टाळण्यास मदत होणार आहे.
https://www.prahaar.in/2026/11/29/joy-over-wifes-selection-as-a-teacher-turns-into-a-final-journey-13-dead-in-a-horrific-accident/
अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जोडणी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) अटल सेतूला जोडून चिर्ले ते चिखलेदरम्यान हा उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. 21.8 किलोमीटर लांबीच्या अटल सेतूमुळे दक्षिण मुंबईतून नवी मुंबईकडे जाण्याचा प्रवास अधिक वेगवान झाला आहे. पूर्वी या प्रवासासाठी सुमारे एक तास लागत होता; आता तो साधारण 20 मिनिटांत पूर्ण होतो.
आता अटल सेतूवरून थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर जाता यावे, यासाठी नवीन जोडमार्ग तयार केला जात आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतून निघालेल्या वाहनांना अनेक सिग्नल आणि गर्दीचे जंक्शन टाळून पुण्याच्या दिशेने प्रवास करता येईल.

कळंबोली आणि पळस्पे फाट्यावरील कोंडी कमी होणार
सध्या मुंबई आणि नवी मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहने कळंबोली जंक्शन आणि पळस्पे फाटा परिसरात वाहतूककोंडीत अडकतात. जेएनपीटीकडे जाणाऱ्या मालवाहू कंटेनरमुळेही या मार्गावर वाहनांची गर्दी वाढते. नवीन सहापदरी उन्नत मार्गामुळे या वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.

विमानतळ आणि बंदराकडे जाणाऱ्यांनाही फायदा
या प्रकल्पाचा फायदा केवळ पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांनाच नव्हे, तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू बंदराकडे जाणाऱ्या वाहनांनाही होणार आहे. तसेच पुणे आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठीही हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे.

प्रकल्पाचे काम कधी पूर्ण होणार?
एमएमआरडीएने या प्रकल्पाचे काम फेब्रुवारी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या 67 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. मात्र, उर्वरित काम निर्धारित वेळेत पूर्ण होणार का, याकडे लक्ष लागले आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवास अधिक सोयीचा आणि वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language