Hashtagintro

Kareena-Saif Love Story : …तर माझे किती पैसे वाचले असते, करीनाला असं का म्हणाला सैफ अली खान ?

Kareena And Saif : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे नाव आवर्जून घेतले जाते. लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या जोडीची केमिस्ट्री चाहत्यांना आकर्षित करते. नुकतेच करीना आणि सैफ यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये हजेरी लावली. यावेळी दोघांनी त्यांच्या प्रेमकहाणीतील अनेक मजेशीर किस्से सांगितले. करीनाने खुलासा केला की, सैफने तिला एकदा नव्हे, तर तब्बल तीन वेळा लग्नासाठी प्रपोज केले होते. तिच्या या खुलाशावर सैफने दिलेल्या विनोदी प्रतिक्रियेने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

करीनाला तीन वेगवेगळ्या ठिकाणी सैफने केलं प्रपोज
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या प्रोमोमध्ये करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यातील खास बॉन्डिंग पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात त्यांच्या प्रेमकहाणीचा विषय निघाला असता करीनाने सैफने तिला लग्नासाठी कसे विचारले, याचा मजेशीर खुलासा केला. करीनाच्या म्हणण्यानुसार, सैफने तिला पहिल्यांदा मुंबईत, दुसऱ्यांदा ग्रीसमध्ये आणि तिसऱ्यांदा पॅरिसमध्ये लग्नासाठी प्रपोज केले. अखेर तिने सैफच्या प्रेमाला होकार दिला आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
https://www.prahaar.in/2026/10/17/neha-regrets-turning-down-those-two-films-she-states-quite-clearly/
पहिल्यांदाच हो म्हणाली असतीस तर…
करीनाने तीन वेळा प्रपोज केल्याचा किस्सा सांगितल्यानंतर सैफ अली खानने आपल्या खास विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “जर पहिल्याच वेळी तू हो म्हणाली असतीस, तर माझे किती पैसे वाचले असते!” सैफच्या या मिश्किल उत्तराने कार्यक्रमाचा होस्ट कपिल शर्मा आणि उपस्थित प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही. करीना-सैफमधील हा संवाद त्यांच्या नात्यातील सहजता आणि एकमेकांशी असलेली मजेशीर केमिस्ट्री दाखवणारा ठरला.

‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर फुललं प्रेम
करीना कपूर आणि सैफ अली खान यांची प्रेमकहाणी ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अधिक खुलली. दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखत होते; मात्र चित्रपटाच्या सेटवर त्यांच्यातील जवळीक वाढली आणि दोघे प्रेमात पडले. काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने १६ ऑक्टोबर २०१२ रोजी लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या दाम्पत्याला तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोन मुले आहेत.

कपिल शर्माच्या शोमध्ये करिना-सैफची मैफिल
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये करीना आणि सैफ यांनी वैयक्तिक आयुष्य, लग्नानंतरचे अनुभव आणि एकमेकांच्या सवयींशी संबंधित अनेक मजेशीर किस्से शेअर केले. त्यांच्या गप्पांमधून दोघांमधील खास नातं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. करीना-सैफच्या चाहत्यांसाठी हा एपिसोड खास ठरणार असून, त्यांच्या प्रेमकहाणीतील हे मजेशीर किस्से सध्या मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय ठरत आहेत.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language