Hashtagintro

अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही तेच भारताने केले, थेट अमेरिकेला धक्का..

अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही तेच भारताने केले, थेट अमेरिकेला धक्का..

अमेरिकेने भारतावर मोठे निर्बंध लादली. ज्यानंतर दोन्ही देशातील तणाव चांगलाच वाढला. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका होती. मात्र, पुन्हा त्यांनी एक पाऊल मागे घेतले. भारताने पुन्हा आता एकदा हे स्पष्ट केले आहे की, त्यांचे परराष्ट्र धोरण कोणत्याही एका सत्तेद्वारे निर्धारित केले जात नाही. जरी भारत अमेरिकेसोबत क्वाड सारख्या धोरणात्मक गटांचा भागीदार असला तरीही याचा अर्थ असा अजिबात नाही की, भारत वॉशिंग्टनच्या प्रत्येक भूमिकेसोबत सहमत असेलच. G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आणि क्वाडच्या चर्चेदरम्यान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ही भूमिका घेतली. भारताने एकप्रकारे अमेरिकेला मोठा धक्काच दिला. काही वर्षांचा विचार करता भारत आणि अमेरिकेचे संबंध तसे तणावात आहेत.

भारतावर अनेक निर्बंध अमेरिका लावताना दिसली. अमेरिकेच्या तालावर भारताने नाचावे, ही इच्छा त्यांची आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानसोबतही जवळीकता वाढवली. अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये भारताने आपल्या स्वतंत्र विचारसरणीवर आणि स्वत: निर्णय घेण्याच्या अधिकारावर भर दिला. चीनच्या आर्थिक आणि धोरणात्मक हालचालीवरही भारताने प्रश्न उपस्थित केली.

अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा म्हणून पाहणेही चुकीचे असल्याचे भारताने म्हटले. मागील काही दिवसांपासून भारताने आपली भूमिका स्पष्ट ठेवली. भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला. भारत जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी थांबवणार नाही, तोपर्यंत हा टॅरिफ कायम राहणार असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.

त्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध पेटले आणि रशियावरील तेलावर असलेले निर्बंध अमेरिकेने हटवले. भारताने वेळोवेळी स्पष्ट केले की, भारत कोणाकडून काय खरेदी करणार हे स्वत: ठरवणार. मागील काही दिवसांचा विचार केला असता भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारली आहेत. चीनचे अध्यक्ष काही दिवसांपूर्वीच भारताच्या दाैऱ्यावर आले होते. दोन्ही देशात संबंध सुधारत आहेत. काही करारही भारत आणि चीनमध्ये झाले.

Source: TV9 Marathi International

Read full article on TV9 Marathi International

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language