अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार निलेश लंके यांनी मोठा विजय मिळवला आहे. पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघातून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते सुजय विखे-पाटील यांचे समर्थक राहुल शिंदे यांचा पराभव केला. निलेश लंके यांना ६४ मते मिळाली, तर राहुल शिंदे यांना ४० मतांवर समाधान मानावे लागले. या विजयामुळे निलेश लंकेंनी राहुल शिंदे यांचा २४ मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या निवडणुकीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या विजयाने मोठे बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे, सुजय विखे हे याआधीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते, तर एकूण २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध झाल्या होत्या. याचबरोबर, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला, तर माण सोसायटी मतदारसंघातून जयकुमार गोरेंना यश मिळाले आहे.
Source: TV9 Marathi National