Hashtagintro

आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या; मंत्री डॉ. अशोक वुईके यांचे शिक्षकांना आवाहन

नाशिक: आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत त्यांचे शैक्षणिक भवितव्य घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक प्रक्रियेद्वारे नियुक्त झालेल्या शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे. शिवाय, नियुक्तीच्या ठिकाणी पूर्ण वेळ वास्तव्यास राहून विद्यार्थ्यांना नियमित आणि दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी शिक्षकांना केले.
एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, नाशिक येथे आदिवासी विकास विभागात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नवनियुक्त झालेल्या शिक्षकांशी संवाद साधताना मंत्री डॉ. वुईके बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांच्यासह वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नवनियुक्त शिक्षक उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/10/24/minister-chhagan-bhujbal-reviewed-the-drought-situation-in-nashik-district-and-issued-important-directives-to-the-officials/
आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांना प्रगतीच्या व्यापक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विभाग प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे. पात्र व सक्षम शिक्षकांची नियुक्ती करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या प्रक्रियेत गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आल्याचे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.
शिक्षकांनी नियुक्तीकडे केवळ नोकरीची संधी म्हणून न पाहता आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी म्हणून पाहावे. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, शाळांमधील प्रवेश संख्या आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान, आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि प्रभावी अध्यापन उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्यांचा उपयोग करावा. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी सक्षम करणे, हे सर्वांचे सामूहिक दायित्व असल्याचे मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.
https://www.prahaar.in/2026/10/24/commissioner-shekhar-singh-reviewed-the-flag-hoisting-ceremony-for-the-nashik-trimbakeshwar-simhastha-kumbh-mela/
अन्न व औषध प्रशासन मंत्री झिरवाळ सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, कौशल्ये आणि महत्त्वाकांक्षा विकसित करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ओळखून त्याला प्रोत्साहन दिल्यास तो जीवनात प्रगती करू शकतो. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासाठी नियमित सराव, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे आहेत. शिक्षकांनी केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language