गरीबों की सुनो हे गाणं 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दस लाख' चित्रपटातील आहे. आशा भोसले यांनी हे गाणं मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलं आहे. आजही या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळते.
या गाण्यातून गरीब आणि गरजू लोकांच्या अडचणी मांडण्यात आल्या आहेत. गरिबांना मदत करण्याचा आणि त्यांच्या वेदना समजून घेण्याचा संदेश गाण्यातून दिला आहे. विशेषतः लहान मुलांच्या भुकेची व्यथा यात व्यक्त केली आहे.
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हे गाणं भिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गायले जात असे. गरीब व्यक्ती श्रीमंतांना आशीर्वाद देत असल्याचं चित्र या गाण्याशी जोडलं गेलं आहे.
'दस लाख' चित्रपटातील हे गाणं संजय खान आणि बबिता कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. रवि यांनी गाण्याला संगीत दिलं असून प्रेम धवन यांनी त्याचे बोल लिहिले आहेत.
आशा भोसले यांच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये 'चुरा लिया है तुमने', 'दम मारो दम', 'ओ मेरे सोना रे' आणि 'पिया तू अब तो आजा' यांचा समावेश होतो. त्यांच्या आवाजातील ही गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
Source: TV9 Marathi Entertainment





