Hashtagintro

इंडियन आयडॉलमधून बाहेर केलं, त्याचंच गाणं ट्रेंडला, ‘दिलरुबा दिलनशी’च्या आधीच दिलंय नंबर वन गाणं!

इंडियन आयडॉलमधून बाहेर केलं, त्याचंच गाणं ट्रेंडला, ‘दिलरुबा दिलनशी’च्या आधीच दिलंय नंबर वन गाणं!

सध्या सोशल मीडियावर एक गाणं अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. इन्स्टाग्राम रील्स असो किंवा यूट्यूब शॉर्ट्स, सर्वत्र याच गाण्याची चर्चा आहे. अनेक जण या गाण्यावर रील्स बनवत आहेत, तर काहींच्या प्ले-लिस्टमध्येही त्याने जागा मिळवली आहे. गाण्याचे बोलही इतके भन्नाट आहेत की एकदा ऐकल्यानंतर ते गुणगुणण्याचा मोह आवरत नाही. या गाण्याचं नाव आहे ‘दिलरुबा दिलनशी’. पण हे गाणं नेमकं गायलंय तरी कोणी? चला जाणून घेऊया.

कोण आहे ‘दिलरुबा दिलनशी’चा आवाज?

‘दिलरुबा दिलनशी’ हे गाणं गायलं आणि संगीतबद्ध केलं आहे रितू रीबा यांनी. त्यांच्या ‘दिलफेक’ या ईपी अल्बमचा हा भाग असून, 16 ऑक्टोबर 2026 रोजी ते प्रदर्शित झालं. या गाण्याचे बोल सिद्धांत कौशल यांनी लिहिले आहेत. साधारण 2 मिनिटं 53 सेकंदांच्या या रोमँटिक गाण्यात तब्बल 40 उर्दू शब्दांचा सुंदर वापर करण्यात आला आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचं वर्णन मनात वसलेल्या अप्सरेप्रमाणे करताना या गाण्याचे शब्द प्रेमात पाडणारे आहेत.

‘हीर रांझा’ गाण्याने मिळवून दिली ओळख

रितू रीबा हा अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथील गायक आणि संगीतकार आहे. 2014 च्या आसपास त्यानं यूट्यूबवर गाणी अपलोड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 2021 मध्ये तो मुंबईत आला. 2022 मध्ये ‘इंडियन आयडॉल 13’ च्या ऑडिशनमध्ये त्याने स्वतः लिहिलेलं ‘हीर रांझा’ हे गाणं सादर केलं. त्यांच्या या गाण्याने परीक्षकांचंही लक्ष वेधलं. पुढे ‘देसी म्युझिक फॅक्टरी’ या म्युझिक लेबलच्या माध्यमातून हे गाणं प्रदर्शित झालं आणि प्रचंड लोकप्रिय ठरलं.

यानंतर रितू याने ‘मेरी बनोगी क्या’, ‘एक तू ही है’, ‘बारिश आई है’ आणि ‘तेरे साथ’ अशी अनेक गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आणली. आता ‘दिलरुबा दिलनशी’मुळे त्याचा आवाज पुन्हा एकदा सोशल मीडियावर गाजत आहे. या गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर तब्बल 25 मिलियन व्ह्जूय मिळाले आहेत. हे व्ह्यूज केवळ एका महिन्यात मिळाले आहेत. हे गाणं केवळ एकाच महिन्यापूर्वी रिलिज झालं आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language