Hashtagintro

इथे आमच्या घरांवर गोळ्या झाडल्या जात आहेत अन् तुम्ही..; बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी संतापला

इथे आमच्या घरांवर गोळ्या झाडल्या जात आहेत अन् तुम्ही..; बिग बॉसच्या घरात रोहित शेट्टी संतापला

Bigg Boss 20: ‘बिग बॉस 20’च्या घरात यंदाच्या ‘वीकेंड का वार’मध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला. या आठवड्यात सलमान खानऐवजी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि होस्ट रोहित शेट्टीने सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. घरातील स्पर्धकांच्या वागण्यावरून त्याने काही सदस्यांची चांगलीच कानउघाडणी केली. विशेष म्हणजे, मुंबईतील त्याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा उल्लेख करत त्याने स्पर्धकांना सुनावलं. दुसरीकडे, त्याने गुल्लूच्या खेळाचं कौतुक करत त्याला थेट ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्याची ऑफरही दिली. त्यामुळे हा भाग चांगलाच चर्चेत आला आहे.

‘बिग बॉस 20’च्या घरात काजी तौकीर, स्काऊट ओपी, आसिफ खान आणि यंग डीएसए यांच्यातील वादाची चर्चा सुरू होती. काही स्पर्धक एकत्र येऊन काजीला लक्ष्य करत असल्याचं रोहितच्या लक्षात आलं. यावरून त्याने स्काऊट, आसिफ आणि यंग यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं. रोहित म्हणाला की, घरात एकत्र येऊन एखाद्या स्पर्धकाला वारंवार लक्ष्य केल्याने बाहेर प्रेक्षकांसमोर तुमची प्रतिमा खराब होत आहे. तुम्ही एकत्र येऊन ज्या पद्धतीने वागत आहात, त्यामुळे तुमचा खेळ मजबूत होण्याऐवजी चुकीचा संदेश जात आहे.

पहा व्हिडीओ-

तुम्ही छपरी गुंड म्हणून बाहेर ओळखले जात आहात, असं रोहित शेट्टी म्हणाला. यावेळी त्याने थुंकण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. काझी बोलताना थुंकतो, असं आसिफने म्हटलं होतं. याच वेळी त्याने मुंबईतील गोळीबाराच्या घटनांचा संदर्भ देत म्हटलं, “इथे आमच्या घरांवर गोळ्या झाडल्या जात आहेत आणि तुम्ही लोक एकमेकांवर थुंकण्यात व्यस्त आहात.” त्याच्या या वक्तव्याने घरातील स्पर्धकांचं लक्ष वेधून घेतलं. फेब्रुवारीमध्ये रोहित शेट्टीच्या जुहू येथील निवासस्थानाच्या इमारतीवर गोळीबार झाला होता. या घटनेत कोणीही जखमी झालं नव्हतं.

काजी तौकीर आणि इतर स्पर्धकांमधील वादावर रोहितने आपली भूमिका स्पष्ट केली. काजीला वारंवार लक्ष्य करण्याच्या पद्धतीवर त्याने नाराजी व्यक्त केली. तसंच, स्पर्धकांनी एकमेकांशी वागताना मर्यादा पाळणं आवश्यक असल्याचंही त्याने सांगितलं. स्काऊट आणि लव गिल यांच्या नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही रोहितने भाष्य केलं. टेलिव्हिजनवर त्यांचं नातं ज्या प्रकारे दिसत आहे, त्याचा बाहेर चुकीचा अर्थ घेतला जाऊ शकतो, असं त्याने सुचवलं. त्यामुळे स्वतःच्या वागण्याचा विचार करण्याचा सल्ला त्याने स्पर्धकांना दिला.

या भागातील सर्वात खास क्षण म्हणजे गुल्लूसाठी रोहितने दिलेली ऑफर. गुल्लूच्या खेळाचं आणि मनोरंजन करण्याच्या क्षमतेचं कौतुक करत रोहितने त्याला आगामी ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होण्यास सांगितलं. “तू खतरों के खिलाडीमध्ये ये ना,” अशा शब्दांत त्याने गुल्लूला विचारलं. या ऑफरमुळे गुल्लूही उत्साहित झाल्याचं पाहायला मिळालं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language