Hashtagintro

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुष्काळग्रस्तांसाठी मोठी घोषणा, मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी

मुंबई: दिवाळीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. जालना येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मदतीची घोषणा केली आहे, त्यांच्या या घोषणेची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

सणासुदीच्या काळात फराळ आणि शिधावाटपापुरते मर्यादित न राहता, थेट शेतकऱ्यांच्या दारात पोहोचून शिंदेंनी त्यांच्या सर्व अडीअडचणींची जबाबदारी स्वीकारली आहे. संकटकाळात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार देण्यासाठी शिवसेनेकडून मदत करण्यात येत आहे.

https://www.prahaar.in/2026/11/09/minister-nitesh-rane-celebrates-diwali-with-fishermen-at-versova-koliwada-assures-support-to-families/
मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च आणि शिक्षणाची हमी
जालना दौऱ्यादरम्यान अंबादास तांगडे या शेतकऱ्याच्या घरी भेट दिल्यावर एक अत्यंत भावनिक प्रसंग घडला. तांगडे यांच्या बारावीत शिकणाऱ्या मुलीने पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न व्यक्त केले, तेव्हा मुख्यमंत्री शिंदेंनी तात्काळ तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे निर्देश दिले. याशिवाय, दुष्काळामुळे ज्या शेतकरी कुटुंबांमधील मुलींची लग्ने रखडली आहेत, त्या सर्व मुलींच्या लग्नाचा संपूर्ण खर्च शिवसेना करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. आर्थिक संकटात सापडलेल्या तांगडे कुटुंबाने दाखवलेली आपुलकी आणि दिलेली ज्वारी-बाजरीची भेट मनाला हेलावून टाकणारी होती, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला.

https://www.prahaar.in/2026/11/09/irctc-to-operate-temple-trails-of-the-south-bharat-gaurav-special-tourist-train-from-mumbai-click-here-for-detailed-news/
574 उपाययोजना आणि कर्जमाफीवर महत्त्वाची चर्चा
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 574 प्रस्तावित उपाययोजना आणि 16.74 कोटींच्या निधीला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान आणि युनियन बँकेचे 28 कोटींचे कर्ज माफ करण्याच्या कामाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पीककर्जासह अल्प व दीर्घमुदतीच्या शेतीनिगडित कर्जमाफीच्या मागणीवर मंत्रिमंडळात सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

https://www.prahaar.in/2026/11/09/do-not-lose-heart-do-not-take-any-extreme-step-shiv-sena-stands-with-you-deputy-chief-minister-eknath-shinde-assures-farmers/
सावकार आणि बँकांना सज्जड दम
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. नदी खोलीकरण, जनावरांचा चारा, चारा छावण्या आणि टँकरचे नियोजन करण्यासाठी घटनास्थळावरच जेसीबी लावण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. ‘जिथे संकट तिथे शिवसेना’ या भूमिकेतून पक्षाचे कार्यकर्ते काम करत असून शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे भावनिक आवाहन त्यांनी केले. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि 2100 रुपयांचा शब्द पाळला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language