Hashtagintro

ऐन दिवाळीत दुर्घटना सुरूच! मुंबईत 5 ठिकाणी आगीच्या घटना, फटाक्यांमुळे 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

ऐन दिवाळीत दुर्घटना सुरूच! मुंबईत 5 ठिकाणी आगीच्या घटना, फटाक्यांमुळे 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

राज्यासह मुंबई आगीच्या दुर्घटना सुरूच आहे. मुंबईत काल रात्री ५ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. फटाक्यांमुळे कुठे घर, तर कुठे दुकानांना आग लागल्याची घटना घडली. दिवाळीच्या धामधुमीत एका सोळा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलाच्या मृत्यूने दिवाळीला गालबोट लागलं. 16 वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने मालाड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंबईच्या मालाड पश्चिम येथे भीषण आग लागून एका 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मालाडच्या मालवणी परिसरात ही घटना घडली. मालवणीमधील गेट नंबर 8,  अब्दुल हमीद मार्ग परिसरात ही घटना घडली.  या परिसरातील तळमजल्यावरील एका दुकानाला आग लागली होती.  ही आग सुमारे २० बाय ३० फुटाच्या परिसरात पसरली. त्याचवेळी झालेल्या फटाक्यांच्या स्फोटामुळे दुकानाचा स्लॅब कोसळला. या घटनेत एक मुलगा बेपत्ता झाला होता. बेपत्ता असलेला मुलगा नंतर दुकानात मृतावस्थेत आढळला. त्याचे शरीर पूर्णपणे जळाले होते. त्याला खासगी रुग्णवाहिकेतून बीएमसीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. शनवाज नियाज खान असे मृत मुलाचे नाव आहे.

मुंबईत सोमवारी 5 ठिकाणी आग 

मुंबईत सोमवारी रात्री पाच ठिकाणी आग लागण्याची घटना घडली.  मालवणीनंतर दहीसरमध्ये आग लागण्याची घटना घडली.  दहीसरच्या कांदरपाडा परिसरात रात्री आग लागल्याची घटना घडली. आरबीआय कॉलनीमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसिद्ध गुंदेचा शाळेच्या जवळ ही आग भडकली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने पोहोचल्या.  त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

धारावीत एका इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने वेळेवरून पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं.  धारावीनंतर चुनाभट्टी विभागात रात्री 2.40 वाजताच्या सुमारास साईनाथ सेवा मंडळाच्या व्यायाम शाळेचे प्लास्टिकचे शेड अचानक पेटल्याने आग लागली.  माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, चुनाभट्टी पोलिसांसहित मंगलमूर्ती कॅटर्सच्या कर्मचाऱ्यांनी जिवाचं रान करून आग विझविली. अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत रात्री आग लागल्याची घटना घडली होती. अग्निशमन दलाने वेळेवर आगीवर नियंत्रण मिळवलं. मालवणीच्या घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यूची घटना सोडली, तर इतर ठिकाणी लागलेल्या आगीत सुदैवाने कुणीही जखमी झालेल्याची माहिती अद्याप नाही .

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language