Hashtagintro

ऑस्ट्रेलियाच्या लाजिरवाण्या पराभवावर डेव्हिड वॉर्नर संतापला! पॅट कमिन्सच्या संघाला सुनावले; म्हणाला, 'ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची ओळख नाही!'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या डावात 100 धावांची आघाडी मिळवूनही पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाला सामना जिंकता आला नाही. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावात अवघ्या 111 धावांत खुर्दा उडवत सामना जिंकला आणि 3 सामन्यांची कसोटी मालिका आपल्या नावावर केली. ऑस्ट्रेलियाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर चांगलाच संतापला आहे. त्याने संघाच्या फलंदाजांवर जोरदार टीका केली आहे.
फॉक्स क्रिकेटवर सामन्यानंतर बोलताना वॉर्नरने ऑस्ट्रेलियन संघाच्या कामगिरीला ‘अन-ऑस्ट्रेलियन’ असे संबोधले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने सामना जिंकण्यासाठी कोणताही संघर्ष केला नाही, असे म्हणत त्याने नाराजी व्यक्त केली. विशेषतः फलंदाजांच्या कामगिरीवर टीका करताना त्याने ही कामगिरी अत्यंत लाजिरवाणी असल्याचे म्हटले.

288 धावांचे लक्ष्य, पण ऑस्ट्रेलियाचा डाव 111 धावांत संपला!
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 288 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पहिल्या डावातील 100 धावांची आघाडी पाहता ऑस्ट्रेलिया सामना जिंकेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. संपूर्ण संघ अवघ्या 111 धावांत गारद झाला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाला सामना गमावण्यासोबतच कसोटी मालिकाही गमवावी लागली. वॉर्नर म्हणाला, की संपूर्ण मालिकेत फलंदाजांनी गोलंदाजांना निराश केले. पहिल्या कसोटीत मॅट रेनशॉने 74 धावांची खेळी करत संघर्ष दाखवला होता. मात्र, इतर फलंदाजांकडून अपेक्षित कामगिरी झाली नाही. दुसऱ्या डावात रेनशॉही खाते न उघडता बाद झाला.
https://www.prahaar.in/2026/10/31/dhruv-jurel-smashes-fighting-century-to-rescue-team-india-after-batting-collapse-in-india-a-versus-new-zealand-a-test-match/
सिमॉन हार्मरचा फिरकी मारा; 16 धावांत 6 विकेट्स!
ऑस्ट्रेलियाच्या पराभवात दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू सिमॉन हार्मर याची भूमिका महत्त्वाची ठरली. त्याने दुसऱ्या डावात अवघ्या 16 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडानेही 3 फलंदाजांना माघारी धाडले. या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टिकता आले नाही. दुसऱ्या डावात कॅमेरून ग्रीनने 27, तर नॅथन लायनने 33 धावा करत काहीसा प्रतिकार केला. मात्र, ग्रीनच्या चुकीच्या धाव घेण्याच्या निर्णयामुळे जोश इंग्लिसला धावबाद व्हावे लागले. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथनेही या निर्णयावर टीका केली.

WTC गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का!
या पराभवामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे या मालिकेतील पराभवाचा ऑस्ट्रेलियाला मोठा फटका बसला असून, डेव्हिड वॉर्नरच्या टीकेमुळे संघाच्या फलंदाजीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language