Hashtagintro

कोरोनाचा नवा व्हेरिएंट PJ.2.1; पुन्हा येणार कोविडची लाट? भारताला किती धोका?

वर्ष 2019-20 मध्ये कोरोना विषाणूने जवळपास संपूर्ण जगाला चिंतातूर करून सोडलं होतं. आता कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार अस्तित्वात असल्याचे समजते आहे. यावेळी शास्त्रज्ञ PJ.2.1 नावाच्या एका नवीन प्रकारावर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यामध्ये विषाणूच्या स्पाइक प्रोटीनमध्ये अनेक बदल आहेत. हे प्रोटीन कोरोना विषाणूला मानवी पेशींना चिकटून आत प्रवेश करण्यास मदत करते. हा प्रकार किती वेगाने पसरू शकतो आणि सध्याच्या प्रतिकारशक्तीचा त्यावर किती परिणाम होईल, हे समजून घेण्याचा शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत.
PJ.2.1 हा विषाणू सर्वप्रथम मे 2026 मध्ये कॅनडातील ओंटारियो येथे आढळला. त्यानंतर अमेरिका, युरोप, आशिया आणि ओशिनियाच्या काही भागांमध्ये याच्या अस्तित्वाचे अहवाल अमोर आले आहेत. जसजसा त्याचा प्रसार होत आहे, तसतसे कोविड 19 ची दुसरी लाट येऊ शकते का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या लसी या नवीन प्रकाराविरुद्ध प्रभावी ठरतील का? हा विषाणू कोविड 19 च्या जुन्या प्रकारांपेक्षा अधिक धोकायदायक आहे का? जाणून घेऊया…
PJ.2.1 हा कोरोना विषाणू (SARS-CoV-2) चा एक नवीन प्रकार आहे. विषाणूच्या जुन्या प्रकारांमधील काही जनुकीय बदलांसह तो उदयास आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ते MC.10.1.7 या वंशावळीचा आहे जी पूर्वी JN. 1 शी संबंधित होती. या व्हेरिएंटवरील एक अभ्यास ऑक्टोबर 2026 मध्ये ‘जर्नल ऑफ इन्फेक्शन’ मध्ये प्रकाशित झाला. जर्मन शास्त्रज्ञ मार्कस हॉफमन आणि त्यांच्या टीमने PJ.2.1संचारानं पद्धती आणि त्याच्या स्पाइक प्रोटीनच्या वर्तनाचा अभ्यास केला. यातून असे दिसून आले की, PJ.2.1 मध्ये काही विशिष्ट बदल आहेत जे त्याला मानवी पेशींशी जोडले जाण्यास मदत करू शकतात. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये PJ.2.1 चे स्पाइक प्रोटीन असलेल्या कणांनी इतर प्रकारांच्या तुलनेत काही पेशींमध्ये सुमारे 1.5 ते 2.5 पट जास्त प्रवेश करण्याची क्षमता दर्शविली.
https://www.prahaar.in/2026/11/11/train-accident-in-assam-the-engine-and-6-coaches-of-the-kolkata-sairang-express-derailed-all-passengers-are-safe/
कोरोना लस नवीन व्हेरिएंटवर प्रभावी ठरेल का?
PJ.2.1 बाबतचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लसीमुळे मिळणारे संरक्षण. स्पाइक प्रोटीनमधील बदलांमुळे, शरीरातील विद्यमान अँटीबॉडीज या व्हेरिएंटला ओळखण्यास कमी सक्षम असतील अशी चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, प्राथमिक संशोधनाचे निष्कर्ष काहीसे दिलासादायक आहेत. ‘जर्नल ऑफ इन्फेक्शन’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, PJ.2.1 हा इतर अनेक व्हेरिएंट्सच्या तुलनेत लसीमुळे तयार झालेल्या अँटीबॉडीजना चकमा देण्यास कमी सक्षम असल्याचे आढळून आले आहे. विषाणूचा वेगाने होणारा प्रसार आणि त्यामुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जरी PJ.2.1 ने पेशींना चिकटून राहण्याच्या क्षमतेत वाढ झाल्याची सुरुवातीची चिन्हे दाखवली असली तरी, हा प्रकार पूर्वीच्या प्रकारांपेक्षा अधिक गंभीर आजार निर्माण करतो याचा कोणताही पुरावा नाही.
भारतात स्थिती काय?
PJ.2.1 चे रुग्ण अमेरिका, कॅनडा, युरोप, आशिया आणि ओशोनियाच्या काही भागांमध्ये आढळले आहेत. भारतात त्याच्या अस्तित्वाची अद्याप पुष्टी झालेली नाही. INSACOG (इंडियन सार्स कोव्ह 2 जिनोमिक्स कन्सोट्रीयम) नेटवर्क भारतातील कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकारांना ओळखण्याचे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम करते. या नेटवर्कअंतर्गत विविध राज्यांमधून कोविड 19 चे नमुने गोळा केले जातात आणि त्यांच्या जनुकीय रचनेचे अनुक्रमण केले जाते.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language