Hashtagintro

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! IPL 2027 च्या मिनी ऑक्शनची तारीख आली समोर; कधी अन् कुठे होणार?

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! IPL 2027 च्या मिनी ऑक्शनची तारीख आली समोर; कधी अन् कुठे होणार?

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाच्या लिलावाची तारीख निश्चित झाली आहे. यापूर्वी हा लिलाव गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार होता. यानंतर आता याची तारीख आता समोर आली आहे. आयपीएल २०२७ चा लिलाव १६ डिसेंबर रोजी गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या लॉजिस्टिक्स टीमने पाठवलेल्या व्हॉट्सॲप संदेशातून ही तारीख जाहीर करण्यात आली.

लिलावाचे ठिकाण आणि तारखेसंदर्भात फ्रँचायझी मालकांना किंवा सीईओना अद्याप कोणताही औपचारिक ईमेल पाठवण्यात आलेला नाही. बीसीसीआयने एका व्हॉट्सॲप संदेशात म्हटले आहे की, आयपीएल २०२७ साठी खेळाडूंचा लिलाव १६ डिसेंबर २०२६ रोजी गोव्यातील आयटीसी ग्रँड येथे होणार आहे. लिलावासंदर्भात १५ डिसेंबर २०२६ रोजी एक माहिती सत्र आयोजित केले जाईल. अनेक आयपीएल फ्रँचायझींनी क्रिकबझला दुजोरा दिला आहे की, त्यांना हा संदेश मिळाला आहे.

अहवालानुसार, संघांना लॉजिस्टिकल व्यवस्था करण्यास आणि गोव्याला जाण्यासाठी प्रवास बुक करण्यास मदत व्हावी म्हणून हा संदेश पाठवण्यात आला होता. तारखेत बदल होऊ शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी, योग्य वेळी आयपीएल संघांच्या मालकांना आणि सीईओंना एक अधिकृत सूचना पाठवली जाण्याची शक्यता आहे.

मागील तीन आयपीएल लिलाव (२०२४, २०२५ आणि २०२६) दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी येथे परदेशात पार पडले होते. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पुष्टी केली की, अलिकडच्या काळात परदेशात झालेल्या स्पर्धांनंतर स्पर्धेचे ठिकाण पुन्हा भारतात हलवण्याची मंडळाची इच्छा आहे. आयपीएल मिनी लिलावासारखा छोटा कार्यक्रम देशांतर्गत आयोजित करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे सोपे आहे. देशांतर्गत ठिकाण शोधणे कठीण होते. कारण आयपीएल लिलाव साधारणपणे डिसेंबरमध्ये होतात आणि तो भारतात लग्नसराईचा काळ असतो.

१६ डिसेंबर रोजी बंगळूरुमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे त्या सामन्यात सहभागी होणाऱ्या काही खेळाडूंची लिलावासाठी निवड होऊ शकते. असे झाल्यास १६ डिसेंबर हा क्रिकेट चाहत्यांसाठी ‘डबल धमाका’ ठरेल.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language