
छैय्या – छैय्या हे गाणं ऐकलं की आजही अनेकांच्या डोळ्यांसमोर धावत्या ट्रेन वर डान्स करणारा शाहरुख खान आणि मलायका अरोरा येतात. हातात हात घालून ट्रेनच्या छतावर थिरकणारे हे दोघ पाहताना हा डान्स किती सहज केला असेल असं वाटतं. किंवा किती भारी आहे हा डान्स असं वाटतं. पण प्रत्यक्षात या गाण्याचा शूटिंग करणं म्हणजे मोठं आव्हान होतं. धावत्या ट्रेनच्या छतावर डान्स करताना कलाकारांसोबत संपूर्ण टीम मोठी काळजी घ्यावी लागली होती. विशेष म्हणजे या शूटिंगच्या आठवणी सांगताना कोरिओग्राफर फराह खान यांनी अनेक धक्कादायक आणि मजेशीर किस्से सांगितले आहेत
छैया छैया हे गाणं 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिल से’ या चित्रपटातील आहे. या गाण्याला संगीत ए. आर. रहमान यांनी दिला असून, सुखविंदर सिंग आणि सपना अश्वठी यांनी ते गायलं आहे. गाण्याची कोरिओग्राफी फराह खान यांनी केली होती. आजही हे गाणं बॉलीवूडमधील सर्वाधिक लक्षात राहिलेला गाण्यांपैकी एक आहे .
मात्र या गाण्याचा शूटिंग नेहमीच्या चित्रपटांच्या शूटिंग सारखं नव्हतं. सुरुवातीला उटी रेल्वे स्टेशनवर शूट करण्याचा विचार होता. त्यासाठी स्टेशन काही दिवस बंद ठेवण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून ऐनवेळी परवानगी मिळाली नाही. त्यानंतर दिग्दर्शक मनी रत्नम यांनी ट्रेनच्या छतावरच गाणं शूट करण्याची कल्पना मांडली. ही कल्पना ऐकल्यानंतर फरह खान यांनीही त्याला होकार दिला.
मात्र शूटिंगमध्ये सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्नही मोठा होता फराह खान यांनी सांगितलं होतं, की कलाकारांना ट्रेनवर शूट करण्याचा आधीचा अनुभव नव्हता ट्रेन वर आधी रिहर्सल करण्याची संधीही मिळाली नव्हती. त्यामुळे ट्रेन मिळाल्यानंतर थेट शूटिंगला सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे फराह यांनी सुरक्षा बद्दल विचारल्यावर उत्तर दिलं होतं की मदतीसाठी जास्त डान्सर सोबत ठेवू, सुदैवाने पण सुदैवाने शूटिंग दरम्यान कोणत्याही मोठा अपघात झाला नाही
View this post on Instagram
या शूटिंगमध्ये शाहरुख खानलाही भीती वाटत होती हे त्याने खुद्द एका मुलाखतीत सांगितलंय 2017 मध्ये तो PTI शी बोलताना हा अनुभव खूप कठीण आणि भीतीदायक असल्याचा सांगितलं होतं. ट्रेन संततीने धावत असली, तरी वाटेत येणारे पूल ही मोठी समस्या होती. पूल जवळ आला की कलाकारांना खाली वाकण्याचा इशारा देण्यासाठी पांढरा कपड्याचा वापर केला जात होता. तो इशारा दिसताच खाली बसावं लागायचं. पूल डोक्यावरून जाताना त्याचा आवाजही गाण्यामध्ये ऐकू येतो.
या गाण्याच्या शूटिंगमध्ये टिम शाहरूख आणि मलायकाच्या सुरक्षेची काळजी घेत होते. मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं होता की ती ट्रेन वरून खाली पडू नये म्हणून SRK ने तिला सेफ्टी हार्नेस वापरण्याचा आग्रह केला होता. मात्र हार्नेस लावून डान्स करणं कठीण होतं. त्यामुळे या दोघांच्या शूटिंगमध्ये सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा होता. आज गाणं पाहताना पडद्यामागचा थरार लक्षातही येत नाही. मात्र कलाकारांचे धाडस आणि फराह खानची कोरिओग्राफी आणि संपूर्ण टीमच्या मेहनतीमुळे छैया छैयाला बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर स्थान मिळालं आहे
Source: TV9 Marathi Entertainment
